शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या ओपीडी वेगवगेळ्या ठेवाव्यात, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेची रुग्णालयांसाठी नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:57 IST

कोरोना बाधीत रुग्णांसाठी आणि इतरांसाठी ओपडी वेगळी ठेवण्यात यावी असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. या संदर्भातील एक नियमावली तयार करण्यात आली असून ती बुधवार पासून लागू करण्यात आली आहे.

ठाणे : कोरोना सदृष्य लक्षणे असलेल्या रूग्णांपासून नॉन कोव्हीड रूग्णांना कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी ठाणे शहरामधील विविध रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण कक्षामध्ये कोणत्याही रूग्णांची तपासणी करण्याआधी त्या रूग्णाला कोरोना सदृष्य काही लक्षणे आहेत काय याची तपासणी केल्यानंतरच बाह्य रूग्ण कक्षामध्ये त्यांची तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर कोव्हीड आणि नॉन कोव्हीड ओपीडी वेगवेगळ्या असाव्यात अशा प्रकारची नियमावली ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्व रूग्णालयासाठी तयार केली ती नियमावली बुधवारी सर्व रूग्णालयांना निर्गमित करण्यात आली.सद्य:स्थितीमध्ये महापालिकेच्यावतीने कोव्हीड सदृष्य रूग्णांची तपासणी करण्यासाठी शहरामध्ये महापालिकेची आरोग्य केंद्रे आणि काही खासगी हॉस्पीटल्समध्ये ताप बाह्य रूग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त काही खासगी किंवा सरकारी रूग्णालयांतील नॉन कोव्हीड ओपीडीमध्ये तापाची लक्षणे असलेले रूग्ण उपचारासाठी येत असतात. या बाह्य रूग्ण विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस किंवा इतर कर्मचार्यांनी पीपीई कीट्स वापरले नसल्यास त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.                त्याचबरोबर त्या बाह्य रूग्ण विभागामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नॉन कोव्हीड रूग्णांनाही त्याचा संसंर्ग होण्याची शक्यता गृहित धरून नॉन कोव्हीड ओपीडी मध्ये येणाºया रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र ट्रायज एरिया तयार करून त्या ठिकणी त्याची प्राथमिक तपासणी करावी. त्याला ताप, सर्दी, कोरडा खोकला इत्यादीकोव्हीड सदृष्य लक्षणे आहेत का याची तपासणी करावी व त्यानंतरच त्याला नॉन कोव्हीड बाह्य रूग्ण कक्षामध्ये तपासण्यात यावे.अशा व्यक्तीस जर कोव्हीड सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यास तात्काळ जवळच्या ताप बाह्य रूग्ण विभागामध्ये तापासणीसाठी पाठविण्यात यावे अशा सूचना ठाणे महानगरपालिकेने निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर बाह्य रूग्ण विभागामध्ये जे वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत त्यांनी पीपीई किट वापरणे बंधनकारक असून कोव्हीड ओपीडी आणि नॉन कोव्हीड ओपीडी पूर्णत: वेगवेगळी असायला हवी. जेणेकरून नॉन कोव्हीड ओपीडी मधील रूग्णांना कोव्हीड ओपीडीमध्ये येणाºया रूग्णांकडून संसर्ग होणार नाही.ही नियमावली बुधवारी महापालिकेच्यावतीने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना निर्गमित करण्यात आली असून संबंधित रूग्णालय व्यवस्थापनाने कोव्हीडचा संसर्ग रोखण्यासाठी या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे असे आदेश महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या