शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:54 IST

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर तीन ते चार वैद्यकीय अधिकाºयांसह संबधींत महिला वैद्यकीय अधिकाºयांच्या दोन मुलींनाही आता रुग्णालय प्रशासनाने क्वॉरान्टाइन केले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णायातील एका ५५ वर्षीय वैद्यकीय महिला अधिकारी हीलाच कोरोनाची लागण झाली असल्याची बाब समोर आली आहे. या तिच्या संपर्कात आलेल्या ३ ते ४ इतर वैद्यकीय अधिकारी तसेच कोरोना पॉझटिव्ह निघालेल्या या अधिकाऱ्याच्या २ मुलींची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून त्यांना क्वॉरन्टाइन करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी याच हॉस्पिटलमधील एका वैद्यकीय महिला कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी लढा देणाºया अधिकारी तसेच नर्सना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचे या हॉस्पिटलमधील स्टाफचे म्हणणे आहे.               काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात लोकमान्य नगर परिसरातील एका रु ग्णाच्या संपर्कात येऊन ही महिला वैद्यकीय कर्मचारी हीला कोरोना लागण झाली होती. त्यानंतर हॉस्पिटलमधील जवळपास ६० जणांना क्वॉरन्टाइन करण्यात आले होते. तर हॉस्पिटलमधील प्रसूती विभाग देखील बंद कारणात आला आहे. आता एका ५५ वर्षीय वैद्यकीय अधिकारी महिलेला देखील कोरोनाची लागण झाली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातारण आहे. कोरोना पॉझटिव्ह रु ग्ण या हॉस्पिटलमध्ये युनिट हेड असून त्यांच्या संपर्कात त्यांच्या दोन मुली आणि इतर ३ ते ४ वैद्यकीय अधिकारी आहेत. या सर्वाना टेस्ट करून क्वारंटाईन करण्यात येणार आहे.                 मात्र हॉस्पिटलमध्ये वावरत असताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीपीई किट्स उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे आरोप हॉस्पिटलमधील वैद्यकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. मागणी करूनही अद्याप पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर हॉस्पिटलमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून वैद्यकीय अधिकारी आणि महिला कर्मचारी यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय आयसोलेशन वॉर्डमध्ये जाताना पीपीई किट्स दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल