शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधीत रुग्णाचा तडफडून रस्त्यावरच मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:17 IST

ठाण्यातील वाडीया रुग्णालयाबाहेर एकाची तडफड झाल्याची घटना ताजी असतांनाच वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात एका रुग्णाचा रस्त्यात तडफडत मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे.

ठाणे : एकीकडे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची वाढणारी संख्या ठाणेकरांची डोकेदुखी बनत असतांना आता ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात एका ६० वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यु झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या नागरीकाच्या बाजूला १०० ते १५० नागरीक होते, ते त्याचा मृत्यु उघड्य डोळ्यांनी बघत होते, अ‍ॅब्युलन्सही त्याला घेण्यासाठी आली. मात्र सोबत डॉक्टर स्टॉफ नव्हता, त्यामुळे पीपीई कीट अभावी त्याला अ‍ॅब्युलेन्समध्ये टाकण्यास कोणीही पुढे सरसावला नाही. त्यामुळे दोन तास त्याची रस्त्यावर परवड सुरु होती. अखेर त्याचा तिथेच मृत्यु झाला.                  वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात ही दुर्देवी माणुसकिला काळामी फासणारी घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्तीचा त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले. मात्र जागा नसल्याचे सांगून आणि तापाचा रुग्ण दाखल करुन घेत नसल्याचे कारण पुढे करीत, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात सांगण्यात आले. मात्र तेथेही त्याला उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले नाही. तापाच्या रुग्णाला आम्ही दाखल करुन घेत नाही, आधी रिपोर्ट आणा मगच दाखल करुन घेतो असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्या मुलीने आपल्या पित्याला पुन्हा घरी नेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याला जास्तीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्या मुलीने तेथील माजी स्थानिक नगरसेवकाला सांगून अ‍ॅब्युलेन्स मागविली. अ‍ॅब्युलेन्स देखील चारच्या सुमारास त्या परिसरात दाखल झाली. तेव्हाच त्याचा रिपोर्टही आला होता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, अ‍ॅब्युलेन्स घेऊन येणारा चालकाशिवाय डॉक्टर किंवा इतर कोणताही स्टाफ आला नव्हता. तो पर्यंत परिसरातील सुमारे १०० ते १५० नागरीक त्या रुग्णाची होणारी परवड पाहत होते, कारण त्याचा अहवाल हा पॉझीटीव्ह आल्याने कोणीही पुढे जाण्यास तयार होत नव्हता. बघ्यांची गर्दी केवळ त्याची तडफड पाहत होते. तो तडफडत होता, त्याला खुप त्रास होत होता. परंतु पीपीई किट नसल्याने कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हता. यात दोन तासांचा कालावधी निघून गेला आणि त्यातच त्या व्यक्तीचा तेथेच मृत्यु झाला. माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणाºया या घटनेला जबाबदार कोण असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या