शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाच्या पदार्थांना यंदा लागली कोरोनाची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 03:45 IST

हॉटेलचालकांची माहिती : यंदाच्या श्रावणात केवळ पारंपरिक पदार्थांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : श्रावण महिना सुरू झाला की, खवय्यांसाठी उपाहारगृह, हॉटेलमध्ये उपासाच्या विविध पदार्थांची रेलचेल सुरू होते. एरव्ही, केवळ उपवासाच्या दिवशीच मिळणारे हे पदार्थ श्रावणात संपूर्ण महिनाभर मिळत असल्याने खवय्ये या पदार्थांवर चांगलाच ताव मारतात. यंदा मात्र उपासाच्या पदार्थांना कोरोनाची झळ बसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी खास श्रावणात खवय्यांसाठी नवनवीन उपासाचे पदार्थ बनविले जातात. यंदा कोरोनामुळे मर्यादित पारंपरिक उपवासाचे पदार्थ बनविले जात असल्याचे उपाहारगृह व हॉटेलमालकांनी सांगितले.श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांसाठी खवय्ये खास उपाहारगृह किंवा मराठमोळी हॉटेल गाठतात. महिनाभर हे पदार्थ दररोज उपलब्ध करून दिले जातात. खवय्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून नवीन पदार्थदेखील उपलब्ध करून दिले जातात. साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, उपवासाची इडली, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, थालीपीठ, वऱ्याचा भात, वºयाची खिचडी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल, रताळ्याचा कीस, शिकरण, भाजणी, मलई मटका लस्सी, थालीपीठ कचोरी, पुरी भाजी, मसाला दूध, लस्सी, पीयष, गुळाचा खरवस, दुधी हलवा, शेंगदाणा चटणी, उपवासाची थाळी असे विविध चवीचे स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध केले जातात. त्यासाठी खास मेन्यू यादीच असते.दरवर्षी सर्रासपणे हे पदार्थ उपलब्ध असतात. परंतु, कोरोनामुळे काही उपाहारगृहांचे मालक आॅर्डरप्रमाणे हे पदार्थ बनवित आहेत. मराठमोळे हॉटेल, उपाहारगृहमध्ये यंदा ठरावीक पदार्थच बनविले जात आहेत. दुकानांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ महापालिकेने ठरवून दिली आहे. त्यात एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवण्यास सांगितल्याने ९० टक्के फटका बसल्याचे उपाहारगृहाचे मालक संजय पुराणिक यांनी सांगितले.ग्राहकांचीसंख्या रोडावलीकोरोनामुळे ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे. खास श्रावणात दरवर्षी आम्ही नवीन पदार्थ उपलब्ध करून देत असतो. कोरोनामुळे यंदा ते करू शकत नाही. कमी मनुष्यबळ असल्याने ठरावीक पारंपरिक पदार्थ बनविण्यावरच भर दिला जात आहे, असे हॉटेलमालक सनी पावसकर यांनी सांगितले.