शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

कोरोनामुळे नागरिकांनी ऑनलाइन कामे करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच महापालिका मुख्यालय किंवा अन्य ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच महापालिका मुख्यालय किंवा अन्य प्रभाग कार्यालयांत यावे. अन्यथा ऑनलाइन, ई-मेल आणि मोबाइलचा वापर करून महापालिकेशी संबंधित कामे करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी काढले आहेत.

महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये या ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता हे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. अत्यावश्यक कामकाज या आदेशातून वगळण्यात आले आहे. अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांना काही अत्यावश्यक काम असल्यास त्यांनी प्रथम मोबाइलवरून संपर्क साधावा. त्यानंतरच प्रभाग अधिकारी कार्यालयात भेटीसाठी यावे. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे की नाही, याची जबाबदारी सुरक्षारक्षक आणि अधिकारी वर्गाची राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याविरोधात सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे. नागरिकांनी महापालिकेच्या वेबसाइटवर संबंधित अधिकारी आणि विभागास ई-मेल करावा. अत्यंत तातडीचे टपाल आणि मेसेज ई-मेलद्वारे पाठविले जावेत. महापालिका मुख्यालयात दैनंदिन टपाल आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सिस्टीम मॅनेजर यांनी नागरी सुविधा केंद्रात टपाल स्वीकारण्याची सुविधा करावी. नागरिकांचा भेटीचा दिवस तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. महापालिकेचा कर आणि अन्य देय रकमा भरण्यासाठी नागरिकांनी डिजिटल सेवेचा वापर करावा. महापालिका कार्यालयात होणाऱ्या बैठका अत्यावश्यक असतील तर त्या आयोजित कराव्यात. अशा बैठकांना महापालिकाबाहेरील अधिकारी, कर्मचारी, खासगी व्यक्तीना आमंत्रित करण्यात येऊ नये, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

---------------------