शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कोपर पूल अडकला निविदेच्या फेऱ्यात; कागदपत्रांमधील त्रुटीमुळे तिसरी निविदाही बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:41 IST

केडीएमसी चौथ्यांदा राबवणार प्रक्रिया

कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल नव्याने बांधण्यासाठी केडीएमसीने आतापर्यंत दोनदा निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. तिसºया वेळेस एका कंत्राटदाराने निविदा भरली. परंतु, त्याच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने त्याची निविदाही बाद ठरली आहे. त्यामुळे या पुलासाठी आता चौथ्यांदा निविदा मागविण्यात येणार आहेत. पुलाचे काम निविदेच्या फेºयात अडकले असून, ते सुटल्याशिवाय कामाला गती मिळणार नाही.

कोपर रेल्वे उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो बंद करण्याचे आदेश रेल्वेने महापालिकेस दिले होते. त्यानुसार, १५ सप्टेंबर २०१९ ला पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुलाचा खर्च रेल्वे व महापालिकेने अर्धाअर्धा देण्याचा विषय होता. मात्र, पुलाच्या कागदपत्रांचा पत्ता नसल्याने त्यात वेळ गेला. दुसरीकडे नगरसेवकांनी रेल्वेकडून मिळणाºया ५० टक्के खर्चाची वाट न पाहता महासभेत तातडीने १० कोटी रुपये खर्चास मान्यता दिली. त्यामुळे निविदा मागविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, दोनदा निविदा मागविल्या गेल्या. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणारे कंत्राटदार रेल्वेकडे असतात. त्यामुळे कंत्राटदार सुचवावा, अशी विनंती महापालिकेने रेल्वेकडे केली होती. मात्र, त्यास रेल्वेने प्रतिसाद दिला नाही.

तिसºया फेरीत एका कंत्राटदाराने निविदा भरली. मात्र, त्याच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने छाननीत त्याची निविदा बाद झाली. आता पुन्हा चौथ्यांदा निविदा मागविली जाणार आहे. पूल वाहतुकीसाठी बंद करून सात महिने उलटून गेले तरी त्याच्या निविदेस प्रतिसाद मिळत नाही. पुलाच्या कामात दिरंगाई होत असल्याने डोंबिवलीतील नागरिकांना ठाकुर्लीच्या रेल्वे अरुंद पुलावरून वाहतूक करावी लागत आहे. त्याचा सगळ्यात जास्त फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.पूलकोंडी सुटेनाकल्याणच्या पत्रीपुलाला विलंब होत आहे. तर, दुर्गाडी येथील खाडीपुलाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याच्या तीन मार्गिका मेअखेरपर्यंत सुरू होतील. डोंबिवली, मोठागाव ठाकुर्ली येथील माणकोली खाडीपुलाचे काम अर्धवट आहे. सध्या हे काम डोंबिवलीच्या दिशेने झाले आहे. भिवंडीच्या दिशेने कामाला गती नाही.