शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

समाजासाठी झटणाऱ्यांना साथ द्या

By admin | Updated: April 1, 2017 05:29 IST

समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्यांमागे समाजानेही उभे राहिले पाहिजे, असे आवाहन डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी येथे केले.

डोंबिवली : समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्यांमागे समाजानेही उभे राहिले पाहिजे, असे आवाहन डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी येथे केले.छायाचित्रकार मनोज मेहता हे आपल्या मातापित्याच्या स्मरणार्थ समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींना २० वर्षांपासून कैलासभाई मेहता आणि पुष्पलता मेहता पुरस्काराने सन्मानित करतात. या पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. त्याप्रसंगी भिशीकर बोलत होत्या.कैलासभाई मेहता पुरस्कार पूर्वांचलमध्ये कार्य करणाऱ्या जयवंत कोंडविलकर यांना, तर पुष्पलता मेहता पुरस्कार वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या शिल्पा कशेळकर यांना देण्यात आला. पत्रकार भगवान मंडलिक यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ. भिशीकर म्हणाले, सध्या सेल्फीचा जमाना आहे आणि मनोज मेहता हे आपल्या कॅमेऱ्यातून डोंबिवलीतील रत्ने शोधून त्यांच्या कार्याचे कौतुक करीत आहेत. तसेच आपल्या आईवडिलांच्या नावाने त्यांना गौरवतात. असे उदाहरण महाराष्ट्रातील एकमेव आहे. पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांनी असेच कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.जयवंत कोंडविलकर यांनी पूर्वांचल भागात काम करताना येणारे अनुभव सांगितले. या भागातील नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा तसेच पूर्वांचलमधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना साहाय्य करावे, असे आवाहन केले. शिल्पा कशेळकर यांनी वंचित महिलांसाठी काम करताना आलेले अनुभव सांगितले. वेश्या वस्तीमध्ये काम करताना, एचआयव्हीग्रस्त महिलांच्या समस्या सोडवताना, मुस्लिम महिलांचे प्रश्न सोडवताना, कशेळकर यांचे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या अंगावर काटा आला.मंडलिक यांनी डोंबिवलीतील समस्यांचा पाढा वाचला. या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. विकासनिधीमध्ये कशी हेराफेरी केली जाते, याची आकडेवारी सादर केली. याप्रसंगी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, माधव जोशी, आबासाहेब पटवारी, डॉ. कवी, मनोहर शेठ, डॉ. शंतनू नवरे, अशोककुमार दोशी, सदानंद थरवळ, स्नेहल दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक महेश देशपांडे, तर मधुरा ओक हिने सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)