शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘मुन्नाभाई’ आर्किटेक्टवर संक्रांत

By admin | Updated: April 18, 2017 03:58 IST

वास्तुविशारद नसतानाही बांधकामांचे परवाने, नकाशे देणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेतील ‘मुन्नाभाई’ वास्तु विशारदांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आ

मीरा रोड : वास्तुविशारद नसतानाही बांधकामांचे परवाने, नकाशे देणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेतील ‘मुन्नाभाई’ वास्तु विशारदांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी बंदी घातली आहे. त्यांचे बांधकाम परवानग्यांचे प्रस्ताव व नकाशांवर शहरात असंख्य बांधकामे झाली आहेत, हे विशेष. दिल्ली येथील काऊन्सिल आॅफ आर्किटेक्चर यांच्याकडे नोंदणी असलेल्यांनाच वास्तुविशारद म्हणुन काम करता येते. विविध प्रकारच्या रहिवास, वाणिज्य बांधकामांचे नकाशे व प्रस्ताव तयार करण्याचे काम त्यांच्याकडे असते. बांधकाम परवानग्यांचे प्रस्ताव, नकाशे तयार करुन ते सबंधित प्राधिकरणाकडे सादर करुन त्याची मंजुरी घेणे, जोत्याचा दाखला व भोगवटा दाखला प्राप्त करणे तसेच त्या दरम्यान होणारे बांधकाम मंजुर नकाशाप्रमाणे होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी व कर्तव्य ते पार पाडत असतात. असे बांधकामांचे नकाशे व प्रस्ताव तयार करताना विकास नियंत्रण नियमावली आदी बाबींचा विचार त्या्चयाकडून केला जातो.मीरा भार्इंदर मध्ये मात्र विकास नियंत्रण नियमावलीचा सोयीस्कर अर्थ लावत चक्क अभियंतेच वास्तु विशारदाचे काम करत होते. महापालिकेने त्यांना अभियंता म्हणून परवानाही दिला होता. त्याचे नियमित नूतनीकरण होते होते. वास्तु विशारद नसताना ते वशिल्याने व मिळेल त्या मोबदल्यात त्यांची कामे करत. शिवाय विकासकाच्या फायद्यानुसार कागदी घोडे नाचवत त्यांचे प्रस्ताव व नकाशे सादर करत. यातून अनागोंदी व अनियमितता होत असल्याचे आरोप होत होते. या मुन्नाभाई वास्तु विशारदांमुळे रितसर शिक्षण घेणाऱ्या व नोंदणीकृत असलेल्यांच्या पदरी उपेक्षाच पडत होती. त्यांच्यापेक्षा या मुन्नाभार्इंकडेच जास्त काम असे. विकासकांसह संबधितांची रीघ लागत होती. पण त्यांच्याकडून तयार झालेल्या बांधकाम प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह कायम होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणीही झाली होती. परंतु विकास नियंत्रण नियमावलीचा संदर्भ जोडून किंवा अन्य मार्गाने तक्रारदारांची बोळवण करुन प्रकरण दडपले जात होते. वास्तुविशारदांकडून अनेक वर्ष या मुद्द्यावर पाठपुरावा सुरू होता. काऊन्सिल आॅफ आर्किटेक्चरने या विरोधात ३० जानेवारी २०१७ ला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर १४ फेब्रुवारीला निकाल देताना न्यायालयाने केवळ काऊन्सिल आॅफ आर्किटेक्चरकडे नोंदणी असलेल्या वास्तुविशारदांनाच काम करण्याचा तसेच बांधकाम प्रस्ताव व नकाशे आदी सादर करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. आदेशानंतर काऊ न्सिलने जाहीर सूचना प्रसिध्द करत त्यांच्याकडे नोंदणी असलेल्यांनाच काम करण्याची परवानगी असल्याचे सांगत अन्य व्यक्तींना मनाई केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि काऊन्सिलच्या जाहीर सूचनेची दखल घेत आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीही ११ एप्रिलला महापालिकेच्या नगररचना व बांधकाम विभागासाठी आदेश काढला. त्यात नोंदणीकृत वास्तुविशारदाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीला वास्तुविशारदाचा परवाना देऊ नये व त्यांना काम करण्यास मनाई करावी असे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)