शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरातील नैसर्गिक नाल्यांवर बिल्डरांची संक्रांत

By admin | Updated: July 27, 2015 02:53 IST

तालुक्याचे मुख्यालय असलेले व शहापूर, गोठेघर, वाफे, चेरपोली, कळंभे ग्रामपंचायतींनी एकत्रित बनलेल्या शहापूर शहरातील नैसर्गिक

भरत उबाळे, शहापूरतालुक्याचे मुख्यालय असलेले व शहापूर, गोठेघर, वाफे, चेरपोली, कळंभे ग्रामपंचायतींनी एकत्रित बनलेल्या शहापूर शहरातील नैसर्गिक नाल्यांवर बिल्डरांची संक्रांत ओढवली असून प्रशासनाने नालेसफाईलाच येथे मूठमाती दिल्याने शहरातील नाल्यांची गटारगंगा तुंबलेलीच राहिली आहे. परंपरागत नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम व्यवसायातील बिल्डरांनी इमारती उभ्या करून नाल्यांचे गळेच घोटले आहेत. काही ठिकाणी भराव टाकून पूर्णपणे बुजविलेले नाले तेथील रहिवाशांनी निदर्शनास आणूनदेखील प्रशासनाने कारवाई केलेली नाही. शहरातील सांडपाण्याचा व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा सोयीस्कर मार्गच त्यामुळे रोखला गेला आहे. चेरपोली-बामणे ग्रामपंचायत हद्दीत राहुलनगर, यमुनानगर, परांजपेनगर, पॉवर हाऊस व शहापूर ग्रामपंचायत हद्दीत कल्पतरू कॉम्प्लेक्स, तावडेनगर, गोणेनगर येथे बेसुमार सुरू असलेल्या बांधकामांनी निसर्गनिर्मित नाल्यांवर गंडांतर आणले आहे. हीच स्थिती वाफे, गोठेघर, कळंभे, सावरोली, बोरशेती, आसनगाव ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहे. पर्जन्य हंगामाच्या नावाखाली तहसीलदार कार्यालयाकडून एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाचा बागुलबुवा उभा केला जात असताना दुसरीकडे कोरड्या दुष्काळाच्या नावाने त्यांचे आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे सुस्तावले आहे. तालुक्याचा व नवनिर्मित शहापूर नगरपंचायतीचा कारभार तहसीलदारच पाहत आहेत. त्यांच्या नेहमीच्या दुर्लक्षामुळे निसर्गनिर्मित नाल्यांवरील बेकायदा बांधकामांना एक प्रकारे अभय मिळाले असून शहराचा पर्यावरणीय समतोल राखणारे उरलेसुरले निसर्गनिर्मित नाले संपुष्टात येण्याची भीती आहे. याबाबत तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)