हुसेन मेमन / जव्हारजिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारने रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या रद्द नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने, जव्हार येथील स्टेट बँकेच्या शाखेत एकच गर्दी झाली होती. जव्हारच्या स्टेट बँकेबाहेर सकाळपासूनच नागरिकांची एकच गर्दी उडाली होती. स्टेट बँकेत नोटा बदलणे आणि पैसे काढण्यासाठी गर्दी वाढतच गेल्याने, आपला नंबर लावण्यासाठी वाद निर्माण व्हायला लागल्याने अखेर जव्हार स्टेट बँकेने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना बोलावले. तसेच सहकारी बँकेतील ग्राहकांना नोटा आपल्या खात्यात आता जमा करता येणार नसल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त करून तीव्र नाराजी दाखवली असून सहकारी बँकेत बंद असलेले व्यवहार लवकरात लवकर पुन्हा सुरु करावे, अशी मागणी केली.जव्हार, मोखाडा, खोडाळा येथील नागरिकांना जव्हार येथील स्टेट बँकेची एकमेव शाखा आहे. गेल्या आठवडा भरापासून लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. मात्र केंद्र सरकारने रद्द केलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा घेण्यास जिल्हा सहकारी बँकांना आजपासून रिझर्वबँकेनी बंदी घातल्याने, जव्हारच्या स्टेट बँकेसमोर गेल्या आठवडाभरापेक्षा मंगळवारी मोठी गर्दी उसळली. जव्हारच्या स्टेट बँकेत सकाळी ६ वाजेपासून म्हातारे कोतारे नागरिक येवून बसले होते. यांना विचारणा केली असता, नंतर गर्दी वाढते आणि आमचा लवकर नंबर लागावा म्हणून आम्ही लवकर येवून बसलो. स्टेट बँकेत सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. जव्हारहून २५ किमी वर असलेल्या पेरणआंबा येथून आनंदी रामजू बोरसे ही ५५ वर्षीय महिला फक्त ५०० रुपये बदलण्यासाठी सकाळी ६ वाजेपासून स्टेट बँकेच्या गेटसमोर थंडीत कुडकुडत प्रथम क्र मांक लाऊन बसली होती, तिने बँक उघडेपर्यंत म्हणजेच ४ तास वाट बघून पैसे सुट्टे करून घेतले.
पोलिसांनी केले गर्दीचे नियंत्रण
By admin | Updated: November 16, 2016 04:14 IST