शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांची १६६ कोटींची देणी राहिली प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:13 IST

उल्हासनगर पालिका आयुक्तांची आढावा बैठकीत माहिती

उल्हासनगर : महापालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी ३५ टक्के निधी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तर ६५ टक्के निधी शहर विकासावर होणे गरजेचे आहे. सरकारी आणि खाजगी कंत्राटदारांची १६६ कोटींची देणी प्रंलबित असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिली.उल्हासनगर महापालिकेचे जकात व मालमत्ता कर हे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत होते. जकात बंद होण्यापूर्वी २०१२ मध्ये महापालिकेला १४६ कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळाले होते. जकातीचा कंत्राटदारा दरवर्षी एकूण जकातीच्या १५ टक्के निधी पालिकेला वाढून देत होता. जर जकात सुरू असती तर २०१९-२० मध्ये जकातीपासून पालिकेला ३८८ कोटी उत्पन्न अपेक्षित होते, असे स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी सांगितले. मात्र राज्य सरकारकडून जीएसटी अनुदाना पोटी वर्षाला फक्त १८० कोटी ४८ लाख उत्पन्न महापालिकेला मिळते असे ते म्हणाले. जकात व एलबीटी उत्पन्नाच्या आकडेवारीत मोठी तफावत असून सरकारने जकातीच्या सरासरी उत्पन्न गृहित धरून अनुदान देणे गरजेचे होते, असे आयुक्तांनी सांगितले.सरकारने एलबीटी ऐवजी जकातीचे सरासरी उत्पन्न गृहीत धरून जीएसटीचे अनुदान दिले तर पालिकेचे तब्बल २०० कोटींनी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तो निधी शहर विकासाकरिता वापरून शहराचा चेहरामोहरा बदलता येऊ शकेल असे मत सभापती वधारिया यांनी व्यक्त केले. राज्य सरकारकडून अनुदान वाढवून घ्या, असा सल्ला दिल्याची प्रतिक्रिया नगरसेवक व्यक्त करत आहेत.‘सातवा वेतना’चा निधी सरकारने द्यावामहापालिकेचे हक्काचे जकात उत्पन्न बंद करून जीएसटी सुरू केला. मात्र जीएसटीचे अनुदान जकात उत्पन्नाच्या सरासरी एवढे मिळत नसल्याची खंत महापालिका अधिकाऱ्यांसह नगरसेवक व्यक्त करत आहेत. आर्थिक संकटात सापडलेली पालिका सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव पाठवणार आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यावर, सातवा वेतनाचा निधी राज्य सरकारने द्यावा अशी मागणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक करणार आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शहरातील विकासकामांवर परिणाम होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका