शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी सफाई कामगारांचा ‘ठिय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:38 IST

केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कंत्राटी कामगारांंचा दोन महिन्यांचा पगार थकल्याने कामगारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली.

कल्याण : केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कंत्राटी कामगारांंचा दोन महिन्यांचा पगार थकल्याने कामगारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली.महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राजेश उज्जैनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. विशाल एक्स्पर्ट या कंत्राटदार कंपनीने कचरावाहू वाहनांवर ४०३ कामगार नेमले आहेत. महापालिका या कंपनीची बिले नियमित अदा करत असून काही कामगारांना वेतन देत आहे. मात्र, मनसेच्या कामगार संघटनेशी संबंधित २५० कामगारांना आकसातून पगार दिला जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. कंत्राटदाराच्या मनमानीमुळे २० नोव्हेंबरला कामगारांनी कंपनीच्या कर्णिक रोडवरील कार्यालयाला टाळे ठोकले होते. त्यानंतरही कंत्राटदाराने काहीच प्रतिसाद न दिल्याने कामगारांनी मुख्यालयाच्या प्रवेसद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.उज्जैनकर म्हणाले की, कामगार हमीपत्र देण्यास तयार आहेत. महापालिकेकडून हमीपत्राचा नमुनाच दिला जात नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता महापालिकेला कामाच्या बिलासोबत ४०३ कामगारांची यादी जोडली असल्याचे समजते. कामगारांच्या हजेरी शेडमध्ये १२५ कामगारच दाखवले आहेत.यासंदर्भात कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आयुक्त संतप्त झाले. कंत्राटदाराने कामगारांचा पगार दिला पाहिजे. कंत्राटी कामगार हे महापालिकेचे नसून कंत्राटदार कंपनीकडे कामाला आहेत. कंत्राटदाराला महापालिकेने बिल अदा केलेले आहे. तरीदेखील कंत्राटदार पगार देत नसल्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी आरोग्य खात्यातील अधिकारी विलास जोशी यांना दिले आहे.>‘पगारातील सात हजार गेले कुठे ?महापालिका करारानुसार पगारासाठी वाहनचालकाला १७ हजार ५७० रुपये, तर सफाई कामगारांसाठी १८ हजार ४१६ रुपये देते. कंत्राटदार मात्र प्रत्येकी १० हजार १३६ रुपयेच पगार अदा करत आहे. पाच टक्के सेवाकर आकारला तरी सफाई कामगाराला १७ हजार रुपये हाती यायला हवेत. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. मग, वरचे सात हजार कुठे जातात, असा सवालही उज्जैनकर यांनी केला आहे.