शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दंतचिकित्सकाच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:47 IST

येथील पूर्व भागातील नामांकित दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती

- लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : येथील पूर्व भागातील नामांकित दंतचिकित्सक डॉ. सचिन कारंडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामागे कौटुंबिक कारणे किंवा व्यावसायिक ताणतणाव आहेत का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. शवविच्छेदनासाठी त्यांचा व्हिसेरा पाठवल्यानंतर दोन ते तीन दिवसात त्याचा अहवाल येईल आणि त्यानंतरच तपासाला गती येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या कुटुंबीय बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अहवालानंतरच त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.डॉ. कारंडे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय सहभागी होते. डोंबिवलीतील गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रेत इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने सहभागी होणाऱ्या चित्ररथाचे ते खऱ्या अर्थाने सारथ्य करीत. त्यात बॅनर लावण्यापासून नियोजनापर्यंतची सर्व जबाबदारी ते आवडीने पार पाडत. दातांच्या सौंदर्य शस्त्रक्रियेत ते पारंगत असल्याने, विशेष प्रावीण्य मिळवल्याने त्यांना यंदाच्या वर्षी गोव्यात होणाऱ्या विशेष परिषदेत गौरविले जाणार होते. गेल्याच आठवड्यात ते डॉक्टरांच्या समूहाने आयोजित केलेल्या पिकनिकमध्येही सहभागी होते. तेव्हाही ते मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले नव्हते. त्यांनी या पिकनिकचा मनसोक्त आनंद लुटल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.डॉ. कारंडे यांच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसल्याने इंडियन डेंटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत यापुढे मानसिक तणावाखाली किंवा कौटुंबिक अडचणीत असलेल्या डॉक्टर सहकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. त्यातून त्यांना मानसिक आधार दिला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.‘तोवर संयम पाळा’ : डॉ. कारंडे यांच्या आत्महत्येचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात उमटले. त्यांनी आत्महत्या केली की हा आणखी काही वेगळा आहे, हे नेमके स्पष्ट होईपर्यत त्याबाबत वृत्त पसरवू नये, असे मत त्यांच्या निकटवर्तीयांनी मांडले.