शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरमध्येही घराघरात दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: July 6, 2017 06:04 IST

नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी भार्इंदर पश्चिम भागातही गढूळ पाणी आले. शहरभर दूषित पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मीरा रोडच्या शीतलनगर, शांतीपार्क भागात सोमवारपासून दूूषित पाणी पालिकेच्या जलवाहिन्यांमधून येऊ लागले. रहिवाशांनी तक्रारी करूनही पालिकेकडून समाधानकारक उत्तर वा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परंतु दूषित पाणीपुरवठा केवळ शीतलनगर वा शांतीपार्क पुरताच न होता भार्इंदर पूर्व, मीरा रोडमध्येही दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने होत आहे. बुुधवारी भार्इंदर पश्चिम, मुर्धा परिसरात दुर्गंधी पाणी आले. संपूर्ण शहरात दूषित पाणीपुपरवठा होत असताना महापालिकेने मात्र सोयीस्कर डोळेझाकच चालवली. पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने सत्यस्थिती जाहीर केलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळासह संतापाची लाट उसळली आहे. वास्तविक ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तर शहरातही अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. लहान असो वा मोठी जलवाहिनी टाकल्यानंतर त्याची काटेकोर स्वच्छता करणे अत्यावश्यक असते. परंतु महापालिकेने जलवाहिन्यांच्या स्वच्छतेबद्दल सोयीस्कर दुर्लक्षच केले. पूर्णपणे जलवाहिन्या साफ झालेल्या नसतानाही त्यातून नागरिकांना पाणी सोडण्यात आले. दूषित पाणी हे उकळून पिण्यायोग्य तर सोडाच आंघोळ व कपडे धुण्यासाठीही नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. बाटलीबंद पाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. गढूळ पाणी इमारतींच्या तळ तसेच गच्चीवरील टाकीत तर गेलेच पण रहिवाशांच्या घरातील टाक्यां मध्ये देखील गेले. त्यामुळे टाक्या साफ करण्याचा नाहक भूर्दंड बसणार आहे. मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेतली. या वेळी शहरातील दूषित पाणी पुरवठ्याबद्दल आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असताना त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सत्तधारी व प्रशासन या पैकी कुणीच नव्हते. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून टाक्यांची सफाई करण्यासाठी पडणारा भूर्दंड पालिका देणार का ? असा सवाल सुर्वे यांनी केला आहे. पावसाची सुरूवात व साकेत- ओवळा दरम्यान ७५ दशलक्ष लिटर पाणी योजनेतील नवीन जलवाहिनी सुरू केल्याने एक ते दोन दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. क्लोरीन टाकले असले तरी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. - सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा कळस असून दूषित पाण्याने संपूर्ण शहराला वेठीस धरले आहे. नव्या जलवाहिन्या पूर्णपणे स्वच्छ केल्याशिवाय त्यांचा वापर करायला नको होता. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. - रोहिदास पाटील, नगरसेवक. पिण्यासाठी वा जेवणासाठी तर सोडाच पण भांडी, कपडे, आंघोळ आदी कामांसाठी देखील वापरू शकत नाही इतके घाणेरडे पाणी येत आहे. स्वच्छ पाणी आणायचे तरी कुठून ? पालिकेने टँकरने पाणी द्यावे.- रंजना पाटील, गृहिणी.