शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
4
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
5
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
6
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
7
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
8
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
9
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
10
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
11
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
12
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
13
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
14
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
15
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
16
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
17
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
18
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
19
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
20
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा

घोसाळी स्मशानभूमीचे बांधकाम अपूर्ण

By admin | Updated: September 26, 2015 22:16 IST

मोखाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोसाळी गावामध्ये शासनाच्या विकास निधीतून फेब्रुवारीपासून स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करण्यात आले.

मोखाडा : मोखाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोसाळी गावामध्ये शासनाच्या विकास निधीतून फेब्रुवारीपासून स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, आज ७ ते ८ महिन्याचा कालावधी उलटला तरी ते अपूर्ण आहे. तसेच ते निकृष्ट असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची स्थानिकांत चर्चा आहे.एक लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात जवळपास २८ ग्रामपंचायती असून त्या दुर्गम भागात असल्याने पेसा कायद्या अंतर्गत येतात. शासनाकडून भविष्यकाळात लाखो रुपयांचा निधी या ग्रामपंचायतीना विकास कामासाठी दिला जाणार आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीना मिळालेल्या जनसुविधा योजनेच्या विकास निधीतून हाती घेण्यात आलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने आता मिळणाऱ्या या निधीतून तरी विकास कामे दर्जेदार होतील का, हा प्रश्न आहे. तालुक्यांतील अनेक गावपाड्यांना जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीच्या बांधकामासाठी लाखोंचा निधी खर्चून स्मशानभूमीची इमारत व सभोवती संरक्षक भिंती तसेच शंभर मीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यापैकी घोसाळी येथील स्मशानभूमी व शंभर मीटर रस्त्याच्या बांधकामासाठी माती मिश्रीत रेती, जुने हलक्या दर्जाचे लोखंडी पोल जे बांधकाम पूर्ण व्हायच्या अगोदरच वाकले आहेत. अशी स्थिती आहे त्यावरुन बांधकामाचा दर्जा किती निकृष्ट आहे शिवाय हे कामही ठेकेदारने अर्धवट सोडले आहे. या बांधकामाचे बिल ते पूर्ण झाले असे दाखवून ठेकेदाराला अदा केल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे या बांधकामाची वरिष्ठाकडून सखोल चौकशी करुन संबधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)