शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील वादग्रस्त कोटरगेट पोलिस ठाण्याचे बांधकाम युतीच्या काळातही दुर्लक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:44 IST

भिवंडी : शहरातील कोटरगेट मजीदच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी झालेल्या दंगलीच्या घटनेस आज ५ जुलै रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पुर्ण झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात या पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी आवाज उठविणाऱ्या सेना-भाजपाने देखील त्यांच्या शासन काळात दुर्लक्ष केल्याने नागरिकांत व पोलीसांत ...

ठळक मुद्देकोटरगेट मजीद समोरील पोलीस ठाण्याच्या बांधकामावरून उसळलेल्या दंगलीस एक तप पुर्णपोलीस ठाण्याच्या अर्धवट कामास भंगार व पडीत इमारतीचे स्वरूप आले पोलीस ठाण्याच्या बांधकामास पुढाकार न घेतल्याने पोलीस दलात नाराजी

भिवंडी : शहरातील कोटरगेट मजीदच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी झालेल्या दंगलीच्या घटनेस आज ५ जुलै रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पुर्ण झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात या पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी आवाज उठविणाऱ्या सेना-भाजपाने देखील त्यांच्या शासन काळात दुर्लक्ष केल्याने नागरिकांत व पोलीसांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरातील निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्यामुळे शहरातील कोटरगेट येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस स्टेशन बांधण्याचे काम ठाणे पोलीस आयुक्त डी शिवानंदन यांच्या आदेशानुसार भिवंडी पोलीस उपायुक्त आर.डी. शिंदे यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू केले. या बांधकामास स्थानिक रजा अ‍ॅकेडमीने विरोध दर्शवित ५ जुलै २००६ रोजी दंगल घडवून आणली. या दंगलीत तत्कालीन पोलिस उपायुक्त आर डी शिंदे यांच्यासह ३९ पोलिस जखमी झाले.तसेच रात्री एका टोळक्याने ५ एसटी बसेसची जाळपोळ केली. तर दंगेखोरांनी वंजारपाटी येथील पोलीस चौकी देखील जाळली. दरम्यान वंजारपाटी नाक्यावरील बागे फिरदोस मशिदीसमोर कर्तव्यावर असणाºया बाळासाहेब गागुर्डे व रमेश जगताप या दोन पोलिसांना दंगेखोरांनी ठार केले होते.या घटनेचे पडसाद राज्यात उमटले. शहरातील विविध पोलीस ठाण्यात दंगलीबाबत शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी आरोप असलेल्या अठरा दंगेखोरांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.मात्र बारा वर्षे होऊनही आजतागाायत पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे या बांधकामास भंगाराचे व पडीत इमारतीचे स्वरूप आले आहे.या जागेत ठाणे आरटीओ अधिकाºयांनी कारवाई झालेली वहाने व इतर सामान पडले आहे. तर बांधकामा भोवतालच्या कंपाऊण्ड भिंती देखील काही ठिकाणी कोसळल्या आहेत.अशा स्थितीत या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी रात्रंदिवस पोलीस पहारा देत आहेत. आघाडीच्या काळात शिवसेना व भाजपाच्या आमदारांनी पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी आकांडतांडव केले होते. आता राज्यात युती शासन असताना बांधकामाच्या कारवाईस कोणीही पुढाकार घेत नसल्याने पोलीस दलांतून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीPolice Stationपोलीस ठाणे