शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हाजुरीमध्ये क्लस्टरसाठी ९५ टक्के रहिवाशांची संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:37 IST

सर्व्हे होणारच पालिकेने केले स्पष्ट; विरोधकांना वगळणार

ठाणे : ठाण्यात क्लस्टरची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नागरिकांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी पालिकेचे एकीकडे प्रयत्न असताना हाजुरीमध्ये मात्र या योजनेला सात ते आठ नागरिकांनी विरोध दर्शवल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सरकारी गावठाण परिसर असलेल्या या परिसरात या योजनेसाठी ९५ टक्के नागरिकांनी संमती दर्शवल्याने ज्या सात ते आठ नागरिकांचा या योजनेला विरोध आहे, त्यांना वगळून उर्वरित घरांचा सर्व्हे होणार असल्याचे पालिका प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले.क्लस्टरअंतर्गत सद्य:स्थितीत असलेल्या बांधकामांची अचूक माहिती प्राप्त व्हावी, यासाठी जीआयएस प्रणाली, लेझर तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या लॅडर तंत्रज्ञान तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येणार आहे. यामुळे अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हाजुरी येथे अशा प्रकारचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारी सकाळी सर्व्हेसाठी ठाणे महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने सर्व्हेचे काम सुरू केल्यानंतर त्याला काही नागरिकांनी विरोध करून सीमांकन झाल्याशिवाय तो करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन तो होऊ दिला नाही.हाजुरी येथील क्लस्टर योजनेसाठी मात्र ९० ते ९५ टक्के नागरिकांनी संमती दर्शवली असून केवळ सात ते आठ नागरिकांचा या योजनेला विरोध असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. विरोध असलेल्या या सर्व मंडळींनी पालिका अधिकाºयांची भेट घेतली असून ज्यांचा विरोध असेल, त्यांचा सर्व्हे होणार नाही. मात्र, ९५ टक्के नागरिकांनी या सर्व्हेसाठी आपली संमती दर्शवली असल्याने त्यांचा सर्व्हे होणार असून नियुक्त केलेल्या एजन्सीला तशा प्रकारचे आदेशपत्रही दिल्याचे पालिकेचे अधिकारी शैलेंद्र भेंडाळे यांनी स्पष्ट केले.या ठिकाणी इमारती आणि सुमारे १२०० पेक्षा अधिक झोपड्यांचा परिसर आहे. यामध्ये काही धोकादायक इमारतींचादेखील समावेश आहे. हा सर्व भाग पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येत असून क्लस्टरसाठी त्यांनीदेखील आधीपासून पुढाकार घेतला आहे. ही योजना या ठिकाणी यशस्वी झाल्यास सर्व नागरिकांना सुरक्षित आणि हक्काचा निवारा मिळणार असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणे