शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी वर्गाला शहराशी जोडणार

By admin | Updated: January 11, 2017 07:19 IST

नाम संस्थेतर्फे शेतकरी वर्गाला शहरांत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडले जाणार आहे. तसेच, यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भावर जास्त

ठाणे : नाम संस्थेतर्फे शेतकरी वर्गाला शहरांत बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असून शेतकऱ्याला ग्राहकाशी थेट जोडले जाणार आहे. तसेच, यावर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भावर जास्त लक्ष असणार आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले ते अनासपुरे यांनी. त्यांना नामच्या आगामी योजनांसदर्भात विचारले असता ते म्हणाले की, एप्रिल महिन्यात ठाण्यासह आठ ते दहा शहरांत धान्य महोत्सव घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच, एका नामांकीत कंपनीशी बोलणी झाली असून ते ६२ हजार एकरवरील तूर, मूग, हरभरा, उडीद हे कडधान्य विकत घ्यायला तयार आहेत. मराठवाड्यात पाण्याचे काम सुरू झाले असून ५७२ किमी नाले, तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. साधारण २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून जिथे ते एक पीक घेतात तिथे तीन पिके घेतील. शासन ही अवाढव्य यंत्रणा आहे. त्यांच्याकडे सर्व उपलब्ध असले तरी सिस्टीमचा भाग अत्यंत भ्रष्ट आहे. एक शेतकरी एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण करतो. परंतु त्याला किंमत नाही. आत्महत्त्या पळपुटेपणा असला तरी शेतकरी ती का करतो याचा विचार सर्वांनी करावा. शेतकऱ्यांची एकजूट नसल्याने त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे दोन वर्ग आहेत. एक बागायतदारांचा आणि दुसरा कोरडवाहू शेतकऱ्यांचा जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शासन शेतकऱ्यांसाठी योजना आखताना सरसकट विचार करते. खरे तर कोरडवाहू शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि आत्महत्त्या करणारा हा वर्ग आहे,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या संघर्ष प्रवासाबद्दल विचारले असते ते म्हणाले की, मला संघर्षावर बोलणे फारसे आवडत नाही. संघर्षाकडे मी नेहमी सकारात्मकतेने पाहिले आहे. संघर्षाचा काळ मी आनंदात घालविला. इंग्रजी भाषा ही जगण्यासाठी अपरिहार्य असली तरी मातृभाषा शिकण्याचा आग्रह असावा. अलिकडे रिअल हिरोंपेक्षा रील हिरोंना जास्त किंमत आहे आणि हे समाजाच्यादृष्टीने घातक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)