शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने; केंद्र सरकारचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:06 IST

ठाण्यात ठिकठिकाणी आंदोलने, ठाण्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

ठाणे : दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी काँग्रेसने समर्थन आंदोलन केले. त्यानुसार गुरुवारी ठाण्यातही काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ठाण्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. वागळे इस्टेट येथील आयटीआय सर्कलजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक अध्यक्ष विनय विचारे, डॉ. अभिजित पांचाळ यांनी शेतकरी समर्थनार्थ निदर्शने केली तर वर्तकनगर येथे ब्लॉक अध्यक्ष आनंद सागळे, मुंब्रा येथेही मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षा दीपाली भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॉक अध्यक्ष नीलेश पाटील यांनी निदर्शने केली. तर कळवा येथेही ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी व रवींद्र कोळी तर लोकमान्यनगर येथे ब्लॉक अध्यक्ष राजू हैबती यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

ठाण्यातील शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाबाहेर ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे, नरेंद्र कदम व नीलेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेससह शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने केल्याचे सचिन शिंदे यांनी सांगितले.

सामाजिक संघटनांचा शेतकऱ्यांना पाठिंबा केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतमालाला किमान हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतक-यांवरील दडपशाही थांबवा, लोकशाहीत संविधानाचा आदर राखून शेतक-यांचे म्हणणे ऐकून सन्मानाने संवाद साधावा आदी मागण्यांसाठी व दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास ठाणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करून पाठिंबा दिला. श्रमिक जनता संघ, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, महाराष्ट्र किसान सभा, भारतीय महिला फेडरेशन आदी विविध संघटनांनी एकत्र येऊन कामगार संघटना संयुक्त कृती समिती व जनआंदोलनाच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी शेतकरीविरोधी कायद्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या.

मुंब्र्यातही काँग्रेसचे आंदोलनकृषी कायद्याविरोधात देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काँग्रेसने मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरात गुरुवारी आंदोलन केले. यावेळी या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेले अन्नधान्य थेट बाजारात विकता येणार नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हा कायदा परत घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जय जवान जय किसानच्या घोषणा देण्यात आल्या. मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षा दीपाली भगत, पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल भगत, ब्लाॅक अध्यक्ष निलेश पाटील, समाजसेवक मोतीराम भगत तसेच भोलानाथ पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा