शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये काँग्रेसचा ‘एकला चलो रे’ नारा !

By admin | Updated: March 30, 2017 06:27 IST

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत

पंकज रोडेकर / भिवंडीठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत. त्यातच या महापालिकेत नंबर वन असलेल्या काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आघाडीऐवजी ऐकला चलो रे! असा सूर उमटत आहे. तर, निवडणुकीची कोणतीही घोषणा झाली नसताना, भिवंडीतून ३०० हून अधिक जण पक्षाच्या तिकीटीवर निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भिवंडी महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांचा (लोकप्रतिनिधी) कालावधी जून महिन्यात संपत आहेत. त्यानुसार येथे मे महिन्याच्या अखेर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयाराम आणि गयाराम यांची या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती ठाणे असो वा मुंबई येथे केविलवाणी झाली आहे. मात्र, भिवंडीत काँग्रेसने जिल्ह्यातील इतर निवडणुकांमधील पाठीमागे लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, चाचपणी करण्यासाठी किती जण इच्छुक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी अर्ज वाटप केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार, जवळपास ३०० हून अधिक जणांनी अर्ज नेले आहेत. त्यामधील २५० जणांनी परत अर्ज भरूनसुद्धा सादर केले आहेत. हा प्रतिसाद पाहून काँग्रेस प्रदेशापातळीवरून नियुक्त केलेल्या निरीक्षकांमार्फत येत्या, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मुखालती घेऊन ते किती सक्षम आहेत हे पाहिले जाणार आहे.ठाणे, उल्हासनगर महापालिकेपाठोपाठ भिवंडीतील आगामी निवडणूकही चार जणांच्या पॅनल पद्धतीने होणार आहे.बारकावे तपासणार मुलाखतीच्या माध्यमातून बारकावे पाहण्यात येणार आहेत. याचदरम्यान, काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा ‘एकला चलो रे’ असा सूर असल्याने आघाडी करायची की नाही, जर करायची तर कुणाशी करायची. याबाबत रणनिती आखली जाणार आहे. नगरसेवकांची संख्या कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देत काही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.