शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वेळापत्रकातही गोंधळ कायम; महिलांच्या राखीव डब्यांमुळे पुरूष प्रवाशांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:33 IST

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकावर बदलापूर व टिटवाळ्यातील रेल्वे प्रवासी आनंदी आहेत, तर कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना मात्र हे वेळापत्रक रुचलेले नाही. बदलापूरमध्ये बुधवारी स्थानकाचा वाढदिवस साजरा झाला.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकावर बदलापूर व टिटवाळ्यातील रेल्वे प्रवासी आनंदी आहेत, तर कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना मात्र हे वेळापत्रक रुचलेले नाही. बदलापूरमध्ये बुधवारी स्थानकाचा वाढदिवस साजरा झाला. तसेच नवीन गाडीचे स्वागत करण्यात आले. त्याच वेळी कल्याण-डोंबिवलीतील प्रवासी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत होते.मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नवीन १८ गाड्यांची भेट मिळाली आहे. त्यात काही लोकलच्या फेºयांचा विस्तार, तर काही लोकलमध्ये महिलांसाठी तीन अतिरिक्त डबे देण्यात आले. मात्र, लोकलच्या वेळांमध्ये बदल झाल्याने बुधवारी त्याचा फटका प्रवाशांना बसला. महिलांच्या जादा डब्यांमुळे पुरुष प्रवाशांची धावपळ उडाली. तर, काही लोकल रद्द झाल्याने अनेकांची गैरसोय झाली. बदलापूरमध्ये नवीन बदलापूर-दादर लोकलचे स्वागत केले. गार्ड, मोटरमन यांना संजय मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ दिला. सकाळच्या दादर लोकलमध्ये महिलांसाठी तीन जादा डबे राखीव झाले आहेत. त्यात बुधवारी सवयीप्रमाणे पुरुष चढल्याने महिलांमध्ये गोंधळ होता. कल्याणच्या अनुष्का केळकर यांनीही सकाळी ८.३४ वाजता फलाट-५ वर येणारी लोकल अचानक सहावर आल्याने गोंधळ झाल्याचे सांगितले. रात्रीच्या शेवटच्या लोकलची वेळ १० मिनिटे अलीकडे आणल्याने प्रवाशांनी रेल्वेवर टीका केली.टिटवाळ्यातीलप्रवाशांना दिलासाटिटवाळ्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सकाळी ८.१० वाजताच्या टिटवाळा-दादर लोकलच्या कसारा दिशेकडील तीन डबे महिलांसाठी राखीव ठेवले आहेत. त्याचबरोबर सायंकाळी ५.०५ वाजता टिटवाळा-सीएसएमटीकरिता नवीन धीमी लोकल सुरू झाली आहे.टिटवाळ्यातील प्रवाशांना मध्य रेल्वेकडून वाढीव फेºयांसह विविध सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष मंचाने वेळोवेळी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, तीन जादा डबे मिळाल्याने बुधवारी सकाळी महिला व मंचाच्या सदस्यांनी टिटवाळा स्थानकात जल्लोष केला.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल