शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अपक्ष आणि बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:13 IST

पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

ठाणे : वेगवेगळ््या पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून मतविभागणी टाळण्यासाठी सोमवारी त्यांनी अर्र्ज मागे घ्यावे, यासाठी त्यांचे मन वळवण्यात येत आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना जे उमेदवारीबद्दल निश्ंिचत होते त्यांनी रविवारी प्रचार सुरू केला. वेगवेगळ््या पक्षांनी यानिमित्त आपापल्या कार्यालयांचे उद््घाटन करून प्रचाराचा नारळ फोडला.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतच मुख्य लढत आहे. त्यानंतर तालुक्यानुसार किंवा गट-गणानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, रिपब्लिकन पक्ष, मनसे असे वेगवेगळे पक्ष रिंगणात आहेत. श्रमजीवी संघटनेने शिवसेनेची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला आहे, तर कुणबी सेना काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांशी समझोता करून उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी काँग्रेसनेही त्यांना सहकार्य केले आहे. पण मुरबाडमधील भाजपाच्या नेत्यांनी मात्र मते फोडण्यासाठी आम्ही काँग्रेसला रिंगणात उतरवल्याचा दावा केला आहे. भिवंडी महापालिकेपासून सुरू असलेला शिवसेना- काँग्रेसच्या मैत्रीचा सिलसिला अद्याप या निवडणुकीत प्रत्यक्षात आलेला दिसलेला नाही. मनसेचा जीव छोटा असला, तरी मोजक्या जागा वगळता त्यांनी अजून कोणाला सहकार्य केलेले नाही. रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट भाजपासोबत आहे, तर भारिपने काँग्रेस, राष्ट्रवादीला सहकार्य केले आहे. त्यामुळे गट-गणानुसार राजकीय चित्र बदलते आहे. हे मतदारसंघ आकाराला छोटे असल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी व्हावी, यासाठी इच्छुक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवार आणि रविवारी वेगवेगळ््या नेत्यांकडून, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत मध्यस्थी करून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी दुपारपर्यंत माघारीची वेळ असल्याने तोवर बंडखोरांचे हवे ते हट्ट पुरवण्यासाठी उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. कामाची-कंत्राटाची आश्वासने, नोकरी, एखादे पद, प्रसंगी काही रक्कम देऊन बंडखोरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अगदीच जमले नाही; तर समाजाचे हित, समाजाचे भले व्हावे, जातीला संधी मिळावी, यासाठी आणाभाका घेतल्या जात आहेत. देवळात किंवा एखाद्या समाजमंदिरात चारचौघांच्या साक्षीने माघारीचा शब्द घेतला जात आहे.भाजपा फोडल्याचा शिवसेनेचा दावाअनगांव : शिवसेनेशी युती करणार असल्याची माहिती पुरवत गोंधळ उडवून देण्याची खेळी करत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राजकीय खळबळ माजवली होती. नंतर शिवसेनेसोबत असलेली श्रमजीवी संघटना फोडली. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला, अशी चर्चा असतानाच शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा फोडल्याचा दावा केला. शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय सेक्यूलरसोबत युती झाली असतानाच भाजपा, काँग्रेसचे पदाधिकारी पक्षात आल्याने युतीची ताकद वाढल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढेही शिवसेनेत इनकमिंग सुरूच राहणार असून त्यामुळे भाजपाला जोरका झटका बसल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. बाधित शेतकºयांना त्यांचा मोबदला मिळायला हवा. आदिवासींना योजनांचा लाभ मिळायला हवा, यावर प्रचारात भर दिल्याचे पाटील म्हणाले.