शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल

By admin | Updated: May 31, 2017 05:49 IST

‘ ई पोर्टल’ च्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या मंगळवारच्या एक दिवसीय देशव्यापी बंदला ठाण्यातून

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘ ई पोर्टल’ च्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या मंगळवारच्या एक दिवसीय देशव्यापी बंदला ठाण्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात इमर्जन्सी काऊंटर्सची माहिती न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना देण्यात आले.आॅनलाईन फार्मसीला विरोध करण्याच्या मुख्य मागणीसाठी हा बंद पुकारलेला होता. कोणत्याही फार्मासिस्ट शिवाय किरकोळ औषध विक्रेता हा मेडीकल चालवू शकत नाही, असा भारतीय कायदा आहे. तसेच डॉक्टरांच्या अधिकृत पत्राशिवाय झोपेच्या, अ‍ॅन्टीबायटीक, खोकल्यावरील अल्फ्राझोलम, कोरेक्स सारखी गुंगीकारक औषधेही आॅनलाईन मिळाल्यामुळे त्याचा मोठा दुष्परिणाम होणार आहे. यालाच विरोध करण्यासाठी २९ मे च्या मध्यरात्री ते ३० मे च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मेडीकल विक्रेत्यांनी हा बंद पाळला. गंभीर रुगणांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयातील मेडीकल स्टोअर्स यातून वगळण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाभर सुमारे २०० इमर्जन्सी मेडीकल काऊंटर्स सुरु ठेवलेली होती, अशी माहिती ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव विजय सुराणा यांनी दिली. ठाणे शहरातील वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर, कोपरी या प्रत्येक विभागात प्रत्येकी दोन अशी २० ते २५ दुकाने तातडीच्या सेवेसाठी सज्ज ठेवलेली होती. या देशव्यापी संपामध्ये ठाणे शहरातील ६००, कल्याणमधील ४०० अशी जिह्यातील पाच हजार औषध विक्रेत्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविल्याचा दावा असोसिऐशनने केला आहे.अत्यावश्यक सेवा उपलब्ध केल्यामुळे अतितत्काळ प्रसंगी रुग्णांना औषधे देण्यात आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी सांगितले.अन्यथा बेमुदत संपकेंद्र सरकारने ‘ई पोर्टल’ बाबतच्या भूमिकेत बदल न केल्यास भविष्यात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या निर्देशानुसार तीव्र आंदोलन छेडले जाईल, प्रसंगी बेमुदत संपही केला जाऊ शकतो, असा इशाराही देशमुख यांनी दिला. या औषध विक्रेत्यांच्या भूमिकेचे निवेदन मंगळवारी दुपारी संघटनेचे देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी गलांडे यांना दिले.