शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

केडीएमटी नियंत्रण कक्षाची दुरवस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 01:09 IST

पाहणी झाली; पण कृती शून्य : दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा?

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचे परिवहन विभागाचे डोंबिवली येथील नियंत्रण कक्ष दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सभापती मनोज चौधरी यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. हा कक्ष बाजूकडील ग्रंथालयाच्या जागेत हलवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. पण, वर्षभरानंतरही कक्षाची दुरवस्था ‘जैसे थे’ राहिली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील दर्शनी भागातील अत्यंत चिंचोळ्या जागेत असलेल्या केडीएमटीच्या नियंत्रण कक्षातील भिंतींना तडे गेल्याने वरील छप्पर कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांना बसायला पुरेशी जागा नाही. पावसाचे ठिबकणारे पाणी, डासांचा होत असलेला त्रास ही एकंदरीतच या कक्षाची अवस्था आहे. मागील वर्षी जुलैमध्ये सभापती मनोज चौधरी, सदस्य संजय पावशे आणि संजय राणे यांनी या कक्षाला भेट दिली होती. तेथील परिस्थितीबाबत त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. तत्काळ येथील कक्ष अन्यत्र हलवण्याचा निर्णय सभापतींसह सदस्यांकडून घेण्यात आला. पर्यायी जागा म्हणून त्यांच्याकडून ग्रंथालय कक्षाची पाहणी करण्यात आली होती. या कक्षात याआधी आधारकार्ड केंद्र उघडण्यात आले होते; पण कालांतराने ते बंद झाले.कधी होणार निर्णय?सध्या महापालिकेचा ‘फ’ आणि ‘ग’ असा संयुक्त आपत्कालीन कक्ष या जागेत आहे. बºयाचशा जागेचा वापर होत नसल्याने तेथे परिवहन नियंत्रण कक्ष चालू करण्यात यावा, असा निर्णय सभापती आणि सदस्यांकडून घेण्यात आला होता. पण, आजतागायत कोणतीही कृती घडलेली नसून कर्मचाऱ्यांच्या नशिबी दुरवस्था कायम राहिली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सुविधा सुरू असल्याने या कक्षात एसटी महामंडळाचे कर्मचारी बसतात. तेही धोकादायक अवस्थेत आपले काम करीत आहेत. या कक्षाला लागूनच नाटकाच्या तिकिटाचे बुकिंग सेंटर आहे. तेही धोकादायक असून छताला असलेले प्लास्टर कोसळण्याची घटना नुकतीच घडली आहे. याठिकाणी सध्या केडीएमटीचे कर्मचारी बसतात.