शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

जिल्ह्यातील १७८ किमी प्रमुख जिल्हामार्गांची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 01:06 IST

अपघाती रस्ते म्हणून ओळख झालेल्यांपैकी आजमितीस कमीतकमी ४० किमीच्या प्रमुख जिल्हामार्गांची तातडीने सुधारणा होण्याची गरज आहे.

ठाणे : जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या इतर जिल्हा (ओडीआर) मार्गांपैकी तब्बल १७८ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा उंचावून ते आता प्रमुख जिल्हामार्ग म्हणजे एमडीआर म्हणून घोषित झालेले आहेत. मात्र, यंदाच्या पावसाने या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

अपघाती रस्ते म्हणून ओळख झालेल्यांपैकी आजमितीस कमीतकमी ४० किमीच्या प्रमुख जिल्हामार्गांची तातडीने सुधारणा होण्याची गरज आहे. त्यासाठी वाहनचालकांकडून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत. यंदाच्या दमदार पावसामुळे जिल्हा परिषदेच्या १२२ किमी रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या सुधारणेसाठी २० कोटींच्या निधीची अपेक्षा जिल्हा परिषदेने केली आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील ४० किमीच्या एमडीआरच्या दुरुस्तीची अत्यंत गरज आहे. मात्र, निधीअभावी या रस्त्यांची कामे रखडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. खड्डे भरण्यासह निखळलेल्या साइडपट्ट्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची गरज आहे. निधीअभावी ही कामे रखडलेली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यांतील १४२ किमी लांबीचे राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत. त्यापैकी ११५ किमी लांबीच्या राज्यमार्गांच्या रुंदीकरणाचे काम हायब्रीड ॲन्युइटीमधून सुरू करण्यात आले आहे. प्रगतीपथावर असलेल्या या राज्यमार्गांव्यतिरिक्त २५१ किमी लांबीचे प्रमुख जिल्हामार्ग (एमडीआर) या बांधकाम विभागाकडे आहेत. त्यापैकी ५६ किमी लांबीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम हायब्रीड ॲन्युइटीमधून बांधकाम विभाग करीत आहे.

ठाणे जि.प.चे रस्ते पीडब्लूडीच्या अखत्यारीत !ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इतर जिल्हामार्गांच्या (ओडीआर) रस्त्यांपैकी एक वर्षापूर्वी १७८ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा उंचावून ते एमडीआर घोषित होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गेले आहेत. या रस्त्यांपैकी बहुतांश रस्ते दयनीय आहेत. पण, त्यातही ४० किमी रस्त्यांची जीवघेणी अवस्था झाली आहे. या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन ३० किमी लांबीचा रस्ता विविध योजनांमधून मंजूर झालेला आहे. त्याद्वारे प्राप्त होणारा कोटींचा निधी प्राप्त झालेला नसल्याची खंत सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :thaneठाणे