शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मिसिंग लिंकसह कोंडीचा घेतला आढावा; ठाण्यात पे ॲण्ड पार्किंगचे पुन:र्सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:42 IST

१५ मार्चपर्यंत जागा निश्चित करण्याचे आयुक्तांचे निर्देश

ठाणे : शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस शाखा यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देतानाच शहरात पार्किंगकरिता प्रभाग समितीनिहाय १५ मार्चपर्यंत जागांचे पुनसर्वेक्षण करून पे ॲण्ड पार्किंगसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी साहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना शुक्रवारी दिले.रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या लक्झरी बस पार्किंगसाठी जागा शोधून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सद्य:स्थितीत शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. यामुळे वाहतूककोंडीसह मिसिंग लिंकचा शर्मा यांनी वाहतूक पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा घेऊन चर्चा केली. शहरात ज्या ठिकाणी गतिरोधक नाहीत त्या ठिकाणी तत्काळ ते टाकण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या. विशेषत: उपवन परिसरात ज्या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने चालविली जातात त्या ठिकाणी प्राधान्याने गतिरोधक बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीमध्ये एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीशी समन्वय साधून रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग, स्पॉट लाईट, गतिरोधक टाकणे, रस्त्याची निगा व देखभाल, दुचाकीकरिता साईन बोर्ड, कार पार्किंग साईन बोर्ड, नो पार्किंग, नो एन्ट्री बोर्ड स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन लावणे, मिसिंग लिंक, रस्त्यांवरील भंगार व बेवारस वाहने, विविध ठिकाणी पार्किंगचे पिवळे व पांढरे पट्टे नव्याने मारणे आदी कामे तत्काळ करण्यास सांगितले. या बैठकीस या वेळी वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह वाहतूक विभागाचे आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.