शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

काँक्रिटचा रस्ता चक्क तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:58 AM

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ : पालिका, एमएमआरडीएची बघ्याची भूमिका

मीरा रोड : एमएमआरडीएने बांधण्यास घेतलेल्या घोडबंदर - जेसलपार्क काँक्रिट रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील काही रस्ता चक्क पोकलेनच्या मदतीने तोडण्यात आल्याचा प्रकार घडला असताना महापालिका व एमएमआरडीने केवळ बघ्याची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ चालवली आहे. रस्ता तोेडतानाचे छायाचित्रण समोर आले असून जागेवर उभे राहून रस्ता तोडायला लावणारी व्यक्ती भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या कार्यालयातील आहे.

विकास आराखड्यातील काशिमीरा महामार्गावरील सगणाई देवी मंदिरापासून अदानी वीज उपकेंद्रापर्यंतच्या जेसलपार्क - घोडबंदर रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम एमएमआरडीएने केले आहे. ६० मीटर रूंद असलेल्या या काँक्रिट रस्त्यासोबत मोठा नाला व गटार आहे. या रस्त्याची लांबी पावणे दोन कि.मी. असून यासाठी ५५ कोटींचा खर्च होणार आहे. हे काम एमएमआरडीएने एनजी कंस्ट्रक्शन कंपनीस दिले आहे. याच मार्गावर मेहतांचा उत्तुंग इमारतींचा प्रकल्प तसेच अन्य काही बिल्डरांचे मोठे प्रकल्प आहेत.रस्ता व नाल्याचे काम सुरू असून दोन दिवसांपूर्वीच येथील एक बाधित बंगला तोडण्यात आला. त्याआधी एक जुना तबेला पालिकेने पोलीस व बाऊंसरच्या बंदोबस्तात तोडला होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी रवी भांगरे याने पडिक बांधकामा मागील नव्याने बनवलेला काँक्रिट रस्ता पोकलेनच्या मदतीने तोडून टाकायला लावला. पोकलेनला ब्रेकर लाऊन नुकताच बांधलेला रस्ता तोेडण्याचे काम रवी करवून घेत असल्याचे पाहून कंत्राटदाराच्या माणसांनी रवीला रस्ता का तोडताय म्हणून विचारणा केली. त्यावर रवीने आयुक्तांनी सांगितले तरी आपण थांबणार नाही. सरांनी सांगितले तरच ऐकू असे सांगत कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. रवी हा मेहतांच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. छायाचित्रण करणाºया एकाचा मोबाइलही हिसकावून घेण्यात आल्याचे कमरचाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुमारे ५० फूट रस्ता तोडण्यात आला असून दोन ठिकाणी हा प्रकार झाला आहे. या घटनेनंतर बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाºयांनी घटनास्थळी जमले होते. त्यांनी मेहतांचा निषेध केला.अधिकाºयांचा बोलण्यास नकारएमएमआरडीचे उपअभियंता प्रशांत वाकोडकर शुक्रवारी घटनास्थळी आले होते. परंतु त्यांनी या बद्दल बोलण्यास नकार दिला. एमएमआरडीएचे अधिकारी नारकर यांच्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर वरिष्ठ अधिकारी कवठणकर यांनीही संबंधितांकडून प्रतिक्रिया घेऊन देतो असे सांगून बोलणे टाळले. त्यामुळे हे प्रकरण वादात सापडणार असे बोलले जातआहे.या रस्त्याचे काम एमएमआरडीएचे असून गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे म्हटले. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मोबदला पालिके देते. काम सुरू झाले तेव्हा कुणी का हरकत घेतली नाही.- बालाजी खतगावकर, आयुक्त.रस्ता तोडण्यात आपला काही संबंध नसून तबेलाचालक आणि जमीनमालक यांच्यापैकी मोबदला कुणाला द्यायचा हा प्रश्न आहे. या वादातून जमीनमालकाने रस्ता नको म्हणून तो तोडला आहे. हा रस्ता व्हावा म्हणून बाधित बांधकामे काढण्यास आपणच सहकार्य केले आहे. - नरेंद्र मेहता, आमदार

टॅग्स :thaneठाणे