शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या स्टारग्रेड अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: July 27, 2015 23:00 IST

एक महिना रखडलेल्या महापालिकेच्या खड्डयांच्या तक्रारीसाठी असलेल्या स्टारग्रेड अ‍ॅपचा अखेर शनिवारी शुभारंभ झाला आणि या अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस पडण्यास सुरवात झाली.

- अजित मांडके,  ठाणेएक महिना रखडलेल्या महापालिकेच्या खड्डयांच्या तक्रारीसाठी असलेल्या स्टारग्रेड अ‍ॅपचा अखेर शनिवारी शुभारंभ झाला आणि या अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस पडण्यास सुरवात झाली. यामध्ये सोमवार पर्यंत ६० तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये ३३ तक्रारी या फेक आहेत. तर इतर विभागांच्याही तक्रारींचा यात समावेश आहे. परंतु शहरात खड्डे नाहीत, असा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेचा हा दावा मात्र या अ‍ॅपने खोटा ठरविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजविण्यासाठी सर्तक झाला आहे. सर्वाधिक ०७ खड्डे हे माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीत आहेत. शनिवारी सकाळी या अ‍ॅपचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ठाणेकर नागरीकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सुरवात केली असून आतापर्यंत ३८६ ठाणेकरांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असल्याची माहिती महापालिकेच्या संगणक विभागाने दिली आहे. तसेच आतापर्यंत यावर ६० तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये ३३ तक्रारी या फेक असल्याची माहिती या अ‍ॅपवर काम करणाऱ्या विभागाने दिली असून काही तक्रारी या कचऱ्याच्या संदर्भातील असून, त्या देखील संबधींत विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. काही रस्त्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या असल्या तरी ते रस्ते महापालिकेकडे नसून इतर यंत्रणांकडे असल्याने त्या तक्रारींची दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये एमएमआरडीए विभागाशी संबधीत तक्रारीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.