शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची पोलीस ठाण्यात तक्रार

By admin | Updated: February 16, 2017 02:00 IST

एका कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या खा. विनय सहस्रबुद्धे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर थेट राष्ट्रवादीच्या आमदारांचा फोटो

आसनगाव : एका कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या खा. विनय सहस्रबुद्धे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर थेट राष्ट्रवादीच्या आमदारांचा फोटो लावल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्वत:च नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर याप्रकरणी शहापूर पोलिसांकडे तक्रारदेखील केली आहे. शहापुरात पशुसंवर्धनांतर्गत आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून खा. विनय सहस्रबुद्धे शहापुरात येणार होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ. पांडुरंग बरोरा यांच्याकडे होते. या कार्यक्रमाला खासदार येत असल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वगताचे बॅनर शहापुरात लावले होते. मात्र, या बॅनरवर राष्ट्रवादीचे आ. बरोरा यांचादेखील फोटो वापरण्यात आला. भाजपाच्या बॅनरवर थेट राष्ट्रवादीच्या आमदाराचा फोटो वापरला गेल्याने तालुक्यात या बॅनरची चर्चा सुरू होती. हे प्रकरण आमदारांनी गांभीर्याने घेत याप्रकरणी थेट पोलिसांकडे तक्रार केली आहे. आपली परवानगी न घेता भाजपाच्या बॅनरवर हे फोटो लावल्याने आपल्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची भाजपाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे बरोरा यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रार दाखल केल्यावर त्यांनी कार्यक्रमाला मात्र उपस्थिती लावली. हा कार्यक्रम शासकीय असल्याने त्याला आपण उपस्थित राहिलो. मात्र, बॅनरप्रकरण हे चुकीचेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)