शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवणारी समिती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:51 IST

झपाट्याने वाढत जाणाऱ्या नागरिकीकरणामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत

नारायण जाधवठाणे : झपाट्याने वाढत जाणाऱ्या नागरिकीकरणामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत. या अतिक्रमणांना वेळीच आळा बसावा, यासाठी हरित वसई संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेच्या अधिन राहून राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मार्च २००९ मध्ये एक १४ सदस्यीय उच्चस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन केली होती. या समितीने ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे व अनुषंगिक प्रश्नांचा सखोल व सर्वंकष अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना करून त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी न्यायालयात सादर करावयाचा होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेली ही समिती कागदावरच राहिल्याने ठाणे जिल्ह्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याचे दिसत आहे.राज्यात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, सामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामांची कारणमीमांसा करताना ही समिती कागदावरच असल्याचे आढळले आहे.समितीचे अहवाल गेले कुठे?या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने २००९ पासून आजपर्यंत गेल्या ९ वर्षांत किती ठिकाणी भेटी दिल्या, किती बैठका घेतल्या, त्या कोठे घेतल्या, काय अभ्यास केला, कोणत्या सर्वंकष उपाययोजना शोधून अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवून त्याचा वेळोवेळी न्यायालयात अहवाल सादर केला, हे गुलदस्त्यात आहे. यामुळेच ठाणे जिल्ह्यात आजही सर्वच महापालिकांसह नगरपालिका, सिडको, एमआयडीसीसह ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामे वाढतच आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील नवी अनधिकृत बांधकामे तोडून टाकण्याकरिता नोटिसा बजावा व भूमाफियांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याची संधी मिळू नये, याकरिता न्यायालयात लगेच कॅव्हेट दाखल करण्याचे आदेशही नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही.दिवसेंदिवस फुटले पेवयामुळेच तेव्हा ठाणे जिल्ह्यात आणि आता पालघर जिल्ह्यात असलेल्या वसई-विरार महापालिकेसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील सर्वच मोठ्या शहरांतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आता आला आहे. नवी मुंबईतील दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवरील ९९ अनधिकृत इमारतींच्या याचिकेनुसार डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, जिल्ह्यात दिवसेंदिवस सर्वत्र अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहतच आहेत. एका आकडेवारीनुसार आजही ठाणे जिल्ह्यात अंदाजे ठाणे महापालिका हद्दीत ६७, ९३३ यात ५३४२ इमारती, केडीएमसी १५६००० यात ७७ हजार इमारती, उल्हासनगर १४ हजार, मीरा-भार्इंदर १० हजार, भिवंडी ५ हजार अनधिकृत बांधकामे आहेत.अशी हवी होती उच्चस्तरीयसनियंत्रण समितीहरित वसई संस्थेने २००७ साली दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी २८ जानेवारी २००९ रोजी अनधिकृत बांधकामांच्या गंभीर प्रश्नावर न्यायालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मार्च २००९ मध्ये नगरविकास विभागाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही १४ सदस्यीय समिती स्थापन केली होती.या समितीमध्ये मुख्य सचिवांखेरीज महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगरविकास, वित्त, मदत व पुनर्वसन या तिन्ही विभागांच्या प्रधान सचिवांसह पर्यावरण, ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास व जलसंधारण या विभागांच्या सचिव, आयुक्त तथा नगरपालिका संचालक, कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे पोलीस आयुक्त आणि नगरविकास विभागाच्या सदस्य सचिवांचा समावेश होता.