शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा स्वच्छ उत्सव कार्यक्रमात आयुक्तांचा निर्धार

By सदानंद नाईक | Updated: April 2, 2023 20:26 IST

 उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

सदानंद नाईक उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ उत्सव कार्यक्रमात शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला. यावेळी सामाजिक संस्था, गृहसंकुल, हॉटेल चालक आदींना कचरा इतरत्र फेकण्या ऐवजी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र घेण्याचे आवाहन केले.

उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी विभागाच्या वतीने स्वच्छ उत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला आयुक्त अजीज शेख, उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहर स्वच्छ व सुंदर राहण्याच्या संकल्पनेतून कार्यक्रमाला हॉटेल चालक, गृहसंकुल पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, दुकानदार आदींना बोलाविण्यात आले होते. आयुक्त अजीज शेख यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून दुकानदार, हॉटेल चालक, गृहसंक आदींनी कचरा इतरत्र न फेकता घंटा कचरा गाडीत टाकण्याचे आवाहन केले. तसेच अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असून हॉटेल चालकासह इतरांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र खरेदी केल्यास, कचऱ्याची जागीच विल्हेवाट लागून कचऱ्याचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे सांगितले. 

शहरात घंटा कचरा गाड्या प्रत्यक्ष परिसरात फिरत असून नागरिकांसह गृहसंकुल, हॉटेल चालकसह इतरांनी कचरा घंटा गाडीत टाकावा. टप्याटप्याने शहरातील कचरा कुंड्याचे खत्ते बंद करून, शहर कचरा कुंडया मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी बोलून दाखविला. महापालिका प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करण्यात आले असून ठेकेदाराचे २७० कंत्राटी कामगार साफसफाई करीत आहेत. या साफसफाईच्या खाजगीकरणाला नागरिकांचा विरोध असलातरी, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ठेका देण्याला मंजुरी दिली होती. त्यामुळे माजी नगरसेवक, कामगार संघटना, राजकीय स्थानिक नेते यांची याबाबत बोलती बंद झाल्याचा आरोप होत आहे. 

सार्वजनिक शौचालयाची दैनावस्था महापालिका स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. तर दुसरीकडे अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचल्याचा आरोप होत आहे. तसेच वर्षाला कोट्यवधी रुपये खर्चूनही सार्वजनिक शौचालयाची दैनावस्था झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagar-acउल्हासनगर