शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

चाचणीबाबत आयुक्तांनाही ठेवले अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:33 IST

तूर्तास ब्रेक : ठाणे महानगरपालिकेवर ओढवली नामुष्की : नियोजन फसले

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनावरील लसीचे ड्राय रन करण्याचे आयोजन मंगळवारी केले होते. तसे सूचना फलकही लावले होते. मात्र, आयुक्तांसह महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे या चाचणीला तूर्तास ब्रेक लावण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली.

गेल्या आठ महिन्यांपासून ठाणे शहरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अशातच कोरोनावर लस कधी येणार याची प्रतीक्षा रुग्णांसह नागरिकांमध्येही आहे. त्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही कोरोना लसींच्या मर्यादित वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी नुकतीच परवानगी दिली.  त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ड्राय रन चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून शहरात पाच ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरीचे नियोजन केले होते.

आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर केले होते आयोजनn कोपरीतील प्रसूतिगृह, कासारवडवली येथील रोझा गार्डन आरोग्य केंद्र, मुंब्रा प्रेक्षागृह आणि मुंब्य्रातील महापालिका शाळा क्रमांक ७८ या ठिकाणी या सराव फेरी होणार होत्या. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजू मुरुडकर यांनी या सराव फेरीचे परस्पर नियोजन केले होते, तसे फलकही संबंधित केंद्रांवर लावले होते, परंतु या चाचणी संदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना कोणतीच कल्पना दिलेली नव्हती. n आयुक्तांच्या संमतीविनाच या चाचणीचे नियोजन केल्याचे समोर आले आहे. या फेरीसाठी शासनाकडूनही आदेश आलेले नाहीत. यामुळेच ही मोहीम बासनात गुंडाळावी लागली आहे. आयुक्तांची परवानगी मिळाली नसल्यामुळे मंगळवारपासून लसीकरण सराव फेरी सुरू होऊ शकलेली नसल्याचा दावा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू मुरुडकर यांनी केला. याबाबत आयुक्तांसोबत चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.पोखरण रोड येथील डॉ. आंबेडकर भवन, तसेच कोपरी येथील सेठ लखमीचंद फतीमचंद प्रसूतिगृह येथील संभाव्य लसीकरण केंद्रावर मंगळवारी जय्यत तयारी केल्याचे आढळले. दिवसाला ९० ते १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असल्याची माहिती या केंद्राचे समन्वयक राजेश कोळी यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात लसीकरण सराव फेरी घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी सराव फेरीची तारीख अद्याप निश्चित केली नाही.     - संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका