शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

आयुक्तांकडून शिवसेनेच्या स्वागत मंडपावर कारवाई; पक्षपातीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:01 IST

एक हजार ७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन

मीरा रोड / भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने निरोप दिला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ३१६ सार्वजनिक, तर एक हजार ७५६ खाजगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर, यंदाच्या गणेशोत्सवात २० हजार ५६९ गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे. पहाटे ५ वाजता जेसल पार्क धक्का येथे शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

दरम्यान, पोलिसांनी लेखी कळवूनही महापालिका आयुक्तांनी विसर्जनमार्गावरील खाद्यपेयांचे स्टॉल, स्टेज, मंडप हटवले नव्हते. भाजपचे मंडप लागले असताना आयुक्तांनी मात्र जेसल पार्क येथे फक्त शिवसेनेच्या स्वागत मंडपावर कारवाई करायला लावल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. हा पक्षपातीपणा असून आयुक्त भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील खाड्या, तलाव, समुद्रकिनारे, नदी व एक कृत्रिम तलाव अशा एकूण २३ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. मोठ्या मूर्तींचे विसर्जन भार्इंदर पूर्व व भार्इंदर पश्चिम धक्का येथे केले जात असल्याने पालिकेने हायड्रोलिक क्रेन आदी यंत्रणा ठेवली होती. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.

विसर्जनाच्या मार्गावर मात्र पोलिसांनी पत्र देऊनही सर्रास बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल, राजकीय स्टेज- मंडप आदी लागले होते. आधीच रस्ते अरुंद त्यातच भार्इंदर पूर्व व पश्चिम मार्गावर मिरवणुका तसेच भाविकांची मोठी गर्दी होत असतानाही महापालिकेने मात्र याकडे सर्रास डोळेझाक केली. यामुळे स्टॉलवर गर्दी होऊन नागरिक रस्त्यावर उभे राहत असल्याने रहदारीला अडथळा होत होता.विशेष म्हणजे स्टॉलधारकांमुळे होणारे उष्टे आणि कचरा सर्वत्र पसरलेला असल्याने कचरापेटीचे स्वरूप आले होते. पालिकेनेही स्टॉलधारकांवर कचऱ्याची जबाबदारी निश्चित न करता सफाई कामगारांना जुंपून स्वच्छता करायला लावली.

एकीकडे पोलिसांनी विसर्जनमार्गावर मंडप, स्टेज, स्टॉल लावू नका म्हणून पत्र देऊनही त्यावर कारवाई न करणारे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी जेसल पार्क येथे मात्र शिवसेना शाखेच्या स्वागत कक्षाच्या मंडपावर कारवाई केली.या कारवाईला शिवसैनिकांनी विरोध करत केवळ शिवसेनेच्याच मंडपावर कारवाई का? अन्य पक्षांच्या मंडपांवर कारवाई का नाही, असे सवाल केले. परंतु, आयुक्तांनी शिवसेनेचा विरोध न जुमानता मंडप काढायला लावला.भाजपच्या सांगण्यावरून आयुक्तांनी कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेचे कामगार सेनेचे पदाधिकारी श्याम म्हाप्रळकर यांनी केला आहे. आयुक्त भाजपची तळी उचलण्याचे काम करत आहेत. महापालिकेचे आयुक्तपद हे कायदे-नियम आणि शहर व जनहिताने राबवले गेले पाहिजे. पण, खतगावकर मात्र आयुक्तपद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे राबवत असल्याची टीका केली.शिवसेना शाखेसमोर कित्येक वर्षांपासून गणरायाला अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचा स्वागत मंडप लागतो. पण, स्थानिक भाजप नगरसेविकेने आयुक्तांकडून मंडप काढायला लावला. बाकी शहरभर मंडप, स्टॉल असताना फक्त शिवसेनेवर कारवाई करून सेनेची नाचक्की केली.- राजेंद्र डाकवे, उपशहरप्रमुख