शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:54 IST

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग

ठाणे : ठाणे-बेलापूर एलिव्हेटेड मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली-काटई मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग करून सुरुवात करण्यात आली. यावेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मु्ंबई आणि कल्याण-डोंबिवली ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. तर या नवीन मार्गामुळे शीळ फाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.

सध्या ऐरोली आणि मुंब्रा या दोन्ही बाजूंकडून या मार्गावरील टनेलचे काम वेगात सुरू आहे. त्याशिवाय ऐरोली-काटई मार्गाच्या पुढे वाय जंक्शन ब्रिजचे कामही सुरू आहे. शीळफाटा उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असून लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला देखील सुरुवात होईल.“पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे) ज्या पद्धतीने मुंबई ते ठाणे शहरांना जोडतो, तसाच हा ठाणे बेलापूर एलिव्हेटेड फ्री वे असेल. त्यामुळे भविष्यात या भागात वाढणारी लोकसंख्या आणि त्यांची रस्त्यांची गरज लक्षात घेता हा मार्ग वाहतूककोंडीची समस्या दूर करण्याचा दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे,” असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.“या मार्गाचे काम येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर ऐरोली आणि काटई यातील अंतर कमी झाल्याने या भागातील वाहतूक अधिक गतिमान होईल. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात डोंबिवली नजीक फ्लायओव्हर येणार असल्याने, तसेच शीळफाटा येथे ओव्हरब्रिज आणि अंडरपास येणार असल्याने भविष्यात या भागात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी बऱ्याच अंशी कमी होईल. तसेच, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरपर्यंतच्या रहिवाशांना त्याचा लाभ मिळेल,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.ऐरोली-काटई बोगद्याची लांबी १.६८ किलोमीटर इतकी असून बोगद्याच्या दोन्ही मार्गिका प्रत्येकी तीन-तीन अशा सहापदरी असणार आहेत. बोगद्यात दोन्ही बाजूला डागडुजीच्या कामासाठी एक रेफ्युज लेनदेखील असणार आहे. याशिवाय या बोगद्यातील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी एग्झॉस्ट फॅन, सीसीटिव्ही यंत्रणा आणि उच्च प्रतीची अग्निशमन यंत्रणादेखील असणार आहे.कल्याण ग्रोथ सेंटर आणि विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात हा मार्ग या परिसराच्या कायापालट करण्यास कारणीभूत ठरू शकेल, अशी अपेक्षाही खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे