शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस आयुक्तालयातील कमांडोंची ‘फोर्स वन’मध्ये बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 23:59 IST

ठाण्याला मिळाला बेस्ट हिटचा किताब

ठाणे : मुंबईच्या फोर्स वनने आयोजित केलेल्या खडतर प्रशिक्षणामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या जलद प्रतिसाद पथकाने बेस्ट हिटचा किताब पटकावून बाजी मारली आहे. या पथकाने ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर स्टार ऑफ दी कोर्सचा पुरस्कार ज्योतिराव पोळ या कमांडोने पटकावला.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील जलद प्रतिसाद पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी, तसेच कमांडोंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकी २१ दिवसांच्या खडतर अशा चिता कोर्सचे आयोजन केले जात आहे. या कोर्सदरम्यान कमांडोंना शारीरिक व्यायामाबरोबरच मनोधैर्य वाढविण्याचे प्रशिक्षण विविध तज्ज्ञांमार्फत देण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थींना सकस आहार, प्रथमोपचार आणि स्फोटके अशा प्रकारचे कॅप्सूल कोर्सचेही आयोजन केले आहे. याच कोर्सच्या प्रभावी आयोजनामुळे मुंबईच्या फोर्स वन यांनी १७ फेब्रुवारी २०२१ ते १९ फेब्रुवारी यादरम्यान घेतलेल्या मूल्यमापन परीक्षांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ७५ टक्के कामगिरी उत्कृष्ट असल्याचे आढळले. त्यानंतर २२ मार्च २०२१ ते ३ एप्रिलदरम्यान फोर्स वन मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातील जलद प्रतिसाद पथकांसाठी उजळणी कोर्स सत्र चारचे आयोजन केले होते. जलद प्रतिसाद पथक, ठाणे शहरांतर्गत चिता कोर्स आणि कॅप्सूल कोर्समधील परीक्षांमध्ये पाचपैकी चार, अशी ८० टक्के पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादन केले.अशी आहे कामगिरीविशेष म्हणजे एकूण सात जलद प्रतिसाद पथकामध्ये ठाणे शहर यांनी ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय सोलापूर जलद प्रतिसाद पथकाने - ७४.७१ टक्के, तर नवी मुंबईने ७५.१४ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) प्रवीण पवार आणि पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि मनोधैर्य उंचाविण्यासाठी या जवानांना मार्गदर्शन करणारे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी या पथकाचे विशेष अभिनंदन केले.बेस्ट पीपीटी पोलीस अंमलदार प्रदीप भोयेबेस्ट बीपीईटी- पोलीस अंमलदार प्रदीप भोयेस्टार ऑफ द कोर्स - पोलीस अंमलदार ज्योतीराव पोळ आणि बेट हिटचे पारितोषिक जलद प्रतिसाद पथक, ठाणे शहर यांनी प्राप्त केले.