शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निवडणूक कामांसह मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात लागणाऱ्या ३२७३ बसेस-ट्रक्ससह जीपगाड्यांची जुळवाजुळव

By सुरेश लोखंडे | Updated: October 8, 2019 19:53 IST

भरारी पथकांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्यां वाहनांची पुर्तता करणे शक्य झाले नाही. यामुळे संबंधीत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अखेर वाहने भाड्याने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्यही कामांसाठी वाहनांची शोधाशोध जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.

ठळक मुद्दे एक हजार ३५२ बसेसची गरज आहे. दोन हजार ९२७ वाहनांची गरज भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आरटीओ कार्यालयाची मदत ३२ ट्रक्स, २६ टेम्पो, पाच कंटेनर आणि एक हजार ४३३ जीप गाड्या

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात २१३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या या प्रचारास दसऱ्यांच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. पण यानंतर भरारी पथके, मतदान केंद्र, मतमोजणीच्या कामांसाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी व साहित्य पुरवठा करण्यासाठी जिल्हह्यातील १८ मतदारसंघाना तब्बल तीन हजार २७३ वाहनांची जुळवाजुळव करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे.        विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी जिल्ह्यातीला शासकीय व निमशासकीय ४४ कार्यालयांचे १६२ वाहने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. सध्यास्थितीला जिल्हह्याभरातील १८ मतदारसंघांमध्ये कार्यरत असलेले विविध स्वरूपांचे भरारी पथकांना जवळपासून १८४ जीव गाड्यांची गरज आहे. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या जमा केलेल्या वाहनांपेक्षा भरारी पथकांना जादा वाहने लागत आहेत. या भरारी पथकांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्यां वाहनांची पुर्तता करणे शक्य झाले नाही. यामुळे संबंधीत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अखेर वाहने भाड्याने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्यही कामांसाठी वाहनांची शोधाशोध जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.         जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मतमोजणी केंद्रांवरील साहित्य, अधिकारी कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी लागणाऱ्यां या तब्बल तीन हजार २७३ वाहनांची देखील शोधाशोध सुरू आहे. यामध्ये २० ते २१ आॅक्टोबर या दोन दिवसांसाठी लागणाऱ्यां एक हजार ३५२ बसेसची गरज आहे. यामध्ये ५० आसनांसह ४२ व ३० असनांच्या मिनी बसेसचा देखील समावेश आहे. या सर्व बसेसपेकी काही बसेस एसटी महामंडळाकडून घेतल्या जाणार आहेत. तर काही बसेस ठाणे, नवी मुंबई, मीरा भार्इंदर व कल्याण डोंबिवली आदी महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बसेस आणि काही खाजगी बसेसचा वापर या निवडणुकीच्या कामांसाठी केला जाणार आहे.           याप्रमाणेच ३२ ट्रक्स, २६ टेम्पो, पाच कंटेनर आणि एक हजार ४३३ जीप गाड्या, ७९ कार आदी दोन हजार ९२७ वाहनांची गरज भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आरटीओ कार्यालयाची मदत घ्यावी लागत आहे. त्यांच्या मार्फत ही वाहने उपलब्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाले आहेत. आरटीओ कार्यालयाच्या भाडे दारानुसार ही वाहने उपलब्ध होत आहेत. यासाठी दोन इस्पेक्टर व एक एआरटीओ आदी वरिष्ठ ुअधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहेत. जिल्ह्यातील या मतदान प्रक्रियेच्या कामांसाठी लागणाऱ्यां वाहनांच्या शोधात जिल्हा प्रशासनाप्रमाणेच आरटीओ विभागातील अधिकारी,कर्मचारी बसेस, ट्रक्स व कंटेनरच्या शोधात आहेत.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक