शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वॉर्डात काम करणारे लढवय्ये मामा-मावशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:41 IST

कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्वच जणांवर ताण आहे. तसा जास्तीचा ताण हा हॉस्पीटलमधील वॉड बॉय आणि मावशींवर देखील आला आहे. कमी स्टाफ असल्याने आहे त्या मावशी मामांच्या खांद्यावर या रुग्णांची प्रमुख जबाबदारी येऊ न ठेपली आहे.

ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांपासून पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच ढाल बनून लोकांचे संरक्षण करीत आहेत. अनेक सामाजिक संस्था आणि पक्षांनी या लढाईत उडी घेतली आहे. सगळ्यांचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे कोरोनाचा पराभव करणे. रु ग्णालयात काम करणारा आणखी एक वर्ग यामध्ये थेट कोरोनाशी दोन हात करतो आहे. हॉस्पीटलच्या भाषेत त्याला मामा, वॉर्ड बॉय अथवा मावशी म्हटले जाते.                     सध्या या मावशी-मामांचा प्रचंड तुटवडा सगळ्याच हॉस्पिटलांना जाणवत आहे. त्यामुळे कोरोना वॉर्डात ५०- ५० रु ग्णांची सेवा करण्याची जबाबदारी दोघा दोघा मावशी-मामांना सांभाळावी लागत आहे. १२-१२ तास हे खरे वॉरीयर्स कोरोनाशी झुंज देत रु ग्णांची सेवा करत आहेत. कोरोना पॉझटिव्ह वॉर्डात या मावशी-मामांची कोरोनाशी लढाई सुरू असून अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात ठाणे महानगर पालिकेने घोषित केलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या ५० रु ग्णांना सेवा देण्यासाठी अवघे चार जण उपलब्ध आहेत. या रु ग्णालयाचे तीन मजले कोरोना रु ग्णांसाठी तयार केले आहेत. त्यामध्ये सुरु वातीला ६ एप्रिल रोजी एक पॉझटिव्ह रु ग्ण उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर एकाच्या घडीला येथे ५० हुन अधिक कोरोना पॉझटिव्ह रु ग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या वॉर्डात जाणारे डॉक्टर, नर्स रु ग्णांमध्ये सुरक्षित अंतर ठेवूनच उपचार करण्याची काळजी घेत असतात. मात्र हे मावशी आणि मामा यांना थेट रु ग्णांच्या संपर्कात जाऊन त्यांची शुश्रूषा करावी लागते. रु ग्ण गंभीर असेल तर त्याला आधार देऊन शौचाला घेऊन जाणे, जेवण भरविणे, बेड सीट बदलणे, कपडे बदलणे अशी कामे करावी लागतात. लहान मुल असेल तर त्याला अंघोळ घालणे, जेवण भरवणे अशी कामे करावी लागतात. सध्या रु ग्णांची संख्या वाढत असतानाच या हॉस्पिटलमधील मावशी-मामांची संख्या मात्र कमी होऊ लागली आहे. रु ग्णांच्या थेट संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावरही हॉस्पिटलने उपचार सुरू केले आहेत. अशी परिस्थिती बहुतके हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे. मावशी आणि मामाच पॉझटिव्ह होत असल्याने कोरोना वॉर्डात रु ग्णांची सेवा करायची कशी? असे प्रश्न रु ग्णालय प्रशासनांना सतावू लागले आहेत. नवीन कर्मचारी मिळणे कठीण झाले आहे. अशाही परिस्थितीत जेवढे मामा व मावशी अद्याप कोरोना पॉझटिव्ह झाले नाहीत, ते एखाद्या वॉरीयर्ससारखे कर्तव्य बजावीत आहेत. दिवसरात्र हॉस्पिटलमध्येच राहून रु ग्णांना सेवा देत आहेत. त्यामुळे या वॉरीयर्सला देखील लोकांचा सलाम आहे. 

मी सहा महिन्यापासू येथे मावशी म्हणून काम करते. ६ एप्रिलपासून मला हॉस्पिटलमध्येच राहायला सांगून कोरोना वॉर्डची जबाबदारी दिली. अंगावर पीपीटी किट घालून १२-१२ तास रु ग्णांची सेवा केली आहे. सहा वर्षीय पॉझटिव्ह मुलीला आंघोळ घालण्यापासून सगळी कामे केली आहेत. सुरु वातीला एक मामा आणि माङयासह तीन मावश्यांनी १६ ते १८ तास काम केले. आता मला कोरोना संसर्ग झाला असल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत, परंतु यातून बरी झाल्यावर पुन्हा त्यांच्या सेवेला जाईल.- कोरोना वॉर्डात काम करणारी मावशी 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या