शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

खाण्यास अयोग्य बर्फ होणार रंगरंगिला

By admin | Updated: May 11, 2017 01:55 IST

खाण्यास योग्य नसलेल्या बर्फावर एकीकडे करडी नजर ठेवून तो सहज ओळखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अनोखा फंडा शोधला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खाण्यास योग्य नसलेल्या बर्फावर एकीकडे करडी नजर ठेवून तो सहज ओळखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अनोखा फंडा शोधला आहे. यानुसार, त्या बर्फात कोणताही रंग टाकून त्याला रंगीबेरंगी करण्याच्या सूचना ते फॅक्टरीचालकांना करणार आहेत. त्यामुळे खाण्यास अयोग्य असलेला बर्फ आता रंगरंगिला होणार आहे. याबाबत, लवकरच ठाणे जिल्ह्यातील बर्फ फॅक्टरीचालकांची बैठक बोलावून त्यांना सूचना करणार असल्याचे एफडीए सूत्रांनी सांगितले.ऐन उन्हाळ्यात मुंबईत ग्रॅस्टो साथ पसरल्याने ठाणे अन्न व औषध प्रशासनाने ठाणे-पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ९ दिवसांत सुमारे १०२ ठिकाणी तपासणी करून खाण्यास अयोग्य असलेला जवळपास २१ हजार किलो बर्फ नष्ट केला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी याबाबत ३ मे रोजी तातडीची बैठक बोलवली होती. त्या वेळी खाण्यास योग्य नसलेल्या बर्फाबाबत त्यांनी काही सूचना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.ठाणे जिल्ह्यात जवळपास ४० ते ४५ बर्फाची निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीज आहेत. त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारे बर्फ तयार केला जातो. यामध्ये ६ फॅक्टरीतखाण्यास योग्य असलेला, तर उर्वरित फॅक्टरीतखाण्यास अयोग्य असलेला बर्फ तयार केला जात आहे. खाद्य दर्जाचा असलेला बर्फ हा बार, हॉटेल्स आदी ठिकाणी नाही तर, तो मासळीची साठवणूक करण्यासाठीही वापरतात. तर, खाण्यास अयोग्य बर्फ जर मासळी साठवणुकीसाठी वापरल्यास त्यातील जिवाणू त्या मासळीत जाऊन ते घातक ठरू शकतात. त्यामुळे वेळीच खबरदारी म्हणून फॅक्टरीचालकांना याबाबत त्याचे परिणाम गांभीर्याने निदर्शनास आणून देण्यासाठी बर्फामध्ये रंगाचा वापर करण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याबाबत, माहिती देण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील बर्फ फॅक्टरीचालकांची बैठक बोलवली आहे. त्या वेळी यापुढे खाण्यास अयोग्य असलेला बर्फ तयार करताना, प्रामुख्याने त्यामध्ये रंगाचा वापर केल्यास तो सर्वांनाच सहजतेने ओळखता येईल, हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.