शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

भरगच्च कार्यक्रमांनी रंगला सखी आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:01 IST

ठाणे : विविध स्पर्धा, कार्यक्रम, फॅशन शो, संगीत मैफल, नृत्याविष्कार आणि सेलिब्रेटिंची उपस्थिती अशा भरगच्च कार्यक्रमांनी सखीमंच आयोजित ‘आनंदोत्सव’ ...

ठाणे : विविध स्पर्धा, कार्यक्रम, फॅशन शो, संगीत मैफल, नृत्याविष्कार आणि सेलिब्रेटिंची उपस्थिती अशा भरगच्च कार्यक्रमांनी सखीमंच आयोजित ‘आनंदोत्सव’ हा तीन दिवसांचा कार्यक्रम ठाण्यात उत्साहात रंगला. या आनंदोत्सवात सखींनी सहभागी होत आनंद लुटला. ज्योवीज स्किम क्लिनिक हे या आनंदोत्सवाचे गिफ्ट पार्टनर होते.प्रेम करणं किंवा होणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. पण आजकालच्या मुलांना प्रेमात भाळणं जमतं मात्र स्वत:ला सांभाळण जमत नाही. आपण आपल्या मुलींना वेळोवेळी वागण्या-बोलण्या-फिरण्याबाबत सूचना देत राहतो. पण मुलांना कधी तशा सूचना करत नाही. आपण आपल्या मुलामुलींना काही गोष्टींत आणि वेळीच नकार द्यायला आणि नकार पचवायला शिकवलं पाहिजे.- साधना जोशी, प्रसिद्ध निवेदिकाआज महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. पण आजच्या महिलेच्या मनात सुरक्षित भावना नाही. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. पण महिलांनी आज सेल्फ डिफेन्स शिकलं पाहिजे. अज्ञातस्थळी आणि रात्रीच्या वेळी कुठेही जाताना शक्यतो कोणी विश्वासातील व्यक्ती सोबत असावी. अज्ञात ठिकाणच्या प्रवासाला जाताना कुटुंबातील व्यक्तींना मोबाइलद्वारे आपले लाइव्ह लोकेशन शेअर करा. आपले कायदे खूप मजबूत आहेत. त्यामुळे आपल्यावर किंवा इतर कोणावरही अत्याचार झाला तर पोलिसांना त्याची माहिती द्या. काहीही लपवू नका. कारण अन्याय करणाऱ्याइतकाच तो सहन करणाराही गुन्हेगार असतो, त्यामुळे झालेल्या अन्यायाबद्दल बिनधास्तपणे कोणत्याही योग्य व्यक्तीशी संवाद साधा.- नीता पाडवी, सहा.पोलीस आयुक्तमहिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले हे जरी खरं असलं तरी महिलांनी घाबरून जाऊ नये. कारण कायदा नावाचा कृष्णसखा आपल्या पाठिशी आहे. आता महिलांनी पोळपाटलाटणी नव्हे तर लेखणी आणि तलवार हाती घेतली पाहिजे. महिलांनी महिलांसाठी एकत्र झाले पाहिजे. महिला जोपर्यंत मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडत नव्हत्या तोपर्यंत सारं काही आलबेल होतं. मात्र गेल्या काही वर्षात या घटनांचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र महिलांनीही याचा विचार करायला हवा. आपण कसे राहतो, कसे वागतो-बोलतो हे पडताळले पाहिजे. महिलांनी समाजात वावरताना आपल्या मर्यादांचे भान ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. अरूंधती भालेराव, संचालिका, प्रारंभ कला अकादमी, मोटीव्हेशनल स्पीकरस्त्रीवर होणाºया अत्याचाराबद्दल बोलायचं ठरवलं तर कुठून सुरू करावे... द्रौपदीच्या वस्त्रहरणाने की अलीकडच्या हृदयद्रावर घटनांनी. मुलामुलींना वाढवणे हे कर्तव्य नसून एक कला आहे. स्त्रीजातीचा अपमान हा समाजमनात खोलवर रूजला आहे. जी आई मुलीचं लग्न हुंडा देऊन करते तीच त्या मुलीची गुन्हेगार आणि मुलाच्या आशेने चारचार मुली होऊ देणारे आईबापही स्त्री जातीचे गुन्हेगार आहेत. कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असले तरी ड्रेसकोड पाळलाच पाहिजे. बीचवेअरसारखे कपडे घालून आपण रेल्वेस्टेशन जावं का आणि नऊवरार नेसून बीचवर जाईन का हे प्रश्न स्वत:ला विचारावे. स्वसंरक्षण प्रत्येक मुलीमुलीला शिकवलं पाहिजे.- डॉ.स्वाती गाडगीळ.