शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे काँग्रेसमध्ये पुन्हा कोल्डवॉर

By admin | Updated: August 11, 2016 04:03 IST

कित्येक महिने रखडलेली ठाणे शहर काँग्रेसची कार्यकारीणी जाहीर झाली असली तरी या जम्बो कार्यकारीणीवरुन आता मतभेद निर्माण झाले आहेत.

ठाणे : कित्येक महिने रखडलेली ठाणे शहर काँग्रेसची कार्यकारीणी जाहीर झाली असली तरी या जम्बो कार्यकारीणीवरुन आता मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वी ब्लॉक अध्यक्षांची निवड ही निवडणूक प्रक्रियेतून केली जात होती. परंतु, आता ती थेट केल्याने या प्रक्रियेला भेद दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीच्या प्रक्रियेतून निवडून आलेले ब्लॉक अध्यक्ष या नव्या निवडीच्या विरोधात आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत. तसेच दुसरीकडे काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार दिल्याने आता त्याच्या विरोधात पक्षाने कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. ठाणे शहर काँग्रेसची घडी बसावी आणि आपसातील मतभेद विसरुन पक्षातील प्रत्येक तरुण मंडळीसह इतर ज्येष्ठ मंडळीदेखील एक दिलाने कामाला लागावी म्हणून पक्ष श्रेष्ठींकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु, असे असतांना प्रभाग क्र. ३२ अ मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर यांनी अपक्ष उमेदवार उभा केला आहे. प्रत्यक्षात पक्षाने येथे अधिकृत उमेदवार दिला असतांना त्यांनी अशा पद्धतीने कार्यवाही केल्याने, शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे घाडीगांवकर यांनी या संदर्भात थेट प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे शिंदे यांच्या विरोधात पत्रव्यवहार केला आहे. केवळ शिवसेनेचा उमेदवार येथे निवडून यावा म्हणूनच प्रभागाच्या बाहेरील पदाधिकाऱ्याला तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सातत्याने शिवसेनेशी छुपी युती करण्याचा घाट शहर अध्यक्ष घालत असून त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आपल्या करिष्म्यावर २५ नगरसेवक निवडून आणावेत, असा टोलाही लगावला आहे. (प्रतिनिधी)