शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात खासगी रूग्णालयांचा लसीकरणास थंडा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:38 IST

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील खासगी रूग्णालयातील लसीकरणाने अद्याप म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ...

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील खासगी रूग्णालयातील लसीकरणाने अद्याप म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यातील दोन खासगी रूग्णालयांमधील लसीकरणाला शुक्रवारी प्रारंभ झाला. अद्याप सात खासगी रूग्णालयांमधील लसीकरण सुरू व्हायचे आहे. केंद्र सरकारने लसीची किंमत नियंत्रित केल्याने खासगी रूग्णालये लसीकरणास फारशी उत्सुक नसल्याची चर्चा आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक व विविध आजारांनी त्रस्त असलेल्यांचा लसीकरणाकरिता खोळंबा होऊ नये याकरिता महापालिकेनी आपल्या लसीकरण केंद्राची संख्या ३० केली आहे. त्याचबरोबर घराजवळ लोकांचे लसीकरण व्हावे याकरिता डिजी ठाणे प्लॅटफॉर्ममार्फत एका क्लिकवर लसीकरण होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

खासगी रूग्णालयात लसीकरण करायचे असल्यास त्याकरिता केंद्र सरकारची परवानगी लागते. त्याकरिता त्या रूग्णालयाने त्यांना किती डोस हवेत त्यानुसार लसीची रक्कम आगाऊ भरणे गरजेचे आहे. असे पैसे भरल्याची पावती महापालिकेस दाखविल्यावर त्यांना लसीचे डोस दिले जातात. केंद्र सरकारने लसीकरण सर्वसामान्यांना परवडावे याकरिता त्याचे दर निश्चित केल्याने खासगी रूग्णालयांना या मोहिमेत लक्षणीय नफा दिसत नसल्याने काही खासगी रूग्णालय बळेबळे या मोहिमेत सहभागी होत असल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या दिवशी १५ केंद्रावर हे लसीकरण सुरू होते. खासगी रूग्णालयांमधील लसीकरण कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणानंतर सुरू होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात आतापर्यंत ठाण्यातील केवळ दोन खाजगी रुग्णालये शुक्रवारपासून लसीकरण करणार आहेत. यामध्ये ज्युपिटर आणि न्यू हॉराईझन प्राईम या रुग्णालयांचा समावेश आहे. उर्वरित सात खाजगी रुग्णालये लवकरच लसीकरण सुरू करतील, असे पालिकेने स्पष्ट केले. मात्र खासगी रूग्णालयांचा थंड प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने आपल्या लसीकरण केंद्रांची संख्या शुक्रवारी दुप्पट करुन ३० केली. आतापर्यंत ३६ हजार हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्करला लस देण्यात आली आहे. १ ते ४ मार्चपर्यंत ४५ ते ६० वयोगटातील ६१५ तर ६० वयोगटापुढील ३६०० ज्येष्ठांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. गुरुवारी एका दिवशी २९९४ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. शहरात येत्या काही दिवसात आणखी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे.

............

लसीकरण केंद्राची माहिती एका क्लिकवर

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आता पालिकेने डिजी ठाणेच्या माध्यमातून एका क्लिकवर आपल्या नजीकचे केंद्र कुठे आहे, याची माहिती उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. यासाठी प्रत्येक केंद्राची लिंक देण्यात आली असून या लिंकच्या माध्यमातून तुम्ही कुठे राहता, याची माहिती त्या ठिकाणी दिल्यास तुमच्यापासून जवळच्या अंतरावर केंद्र कुठे आहे, याची माहिती मिळणार आहे.

..........

ऑफलाइन ६० टक्के रजिस्ट्रेशन

लसीकरणाकरिता ऑनलाइन नोंदणी करतांना अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. या पद्धतीतही अडचणी असल्याचे दिसून येत आहे. ऑफलाइनमध्ये एकाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी जात आहे. त्यामुळे केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. असे असले तरी ६० टक्के नोंदणी ही ऑफलाइन तर ४० टक्के नोंदणी ही ऑनलाइन होत आहे.

...........

१० केंद्र एक दिवसाआड राहणार सुरू

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या २५ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. त्यातील १५ केंद्रावर रोजच्या रोज लसीकरण केले जात आहे. परंतु उर्वरित १० केंद्रावर एक दिवसाआड लसीकरण केले जात आहे. ही १० आरोग्य केंद्रे छोटी असल्याने त्याठिकाणी इतर दिवशी गरोदर मातांची तपासणी, कधी लहान मुलांचे लसीकरण असल्याने गर्दी वाढण्याचा धोका असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये ढोकाळी, बाळकुम, शिळ, वर्तकनगर, उथळसर, आतकोनेश्वर नगर, नौपाडा, काजूवाडी, कोपरी आणि सावरकरनगर केंद्राचा समावेश आहे.

...........