शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी साधेपणाची चौकट स्पष्ट करावी, नियमावली नसल्यामुळे मंडळांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:56 IST

समितीची सुचनावली तयार आहे, पण शासनाची नियमावली तयार नाही. ती लवकर जाहीर व्हावी. मूर्तींच्या उंचीबाबतही कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत.

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, साधेपणाची चौकट स्पष्ट केलेली नाही. ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने सुचनावली तयार केली असली तरी शासनाने नियमावली तयार केली नसल्याने गणेशोत्सव मंडळांमध्ये गोंधळ आहे. गणेशोत्सव हा काही दिवसांवर आला असल्यामुळे शासनाने नियमावली जाहीर करून समन्वय साधावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. साधेपणाने म्हणजे नेमका कसा हे स्पष्ट केले नसल्याचे समिती अध्यक्ष समीर सावंत यांचे म्हणणे आहे. सरकारला आमचे पूर्ण सहकार्य आहे. पण, प्रत्येक शहरात कोरोनाची परिस्थिती वेगळी आहे. त्या परिस्थितीनुसार उत्सवाचे नियम शहरातील मंडळांना विश्वासात घेऊन त्या-त्या महापालिकेने घालून द्यावे. समितीची सुचनावली तयार आहे, पण शासनाची नियमावली तयार नाही. ती लवकर जाहीर व्हावी. मूर्तींच्या उंचीबाबतही कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत.>गणेशोत्सवात चिनी वस्तूंचा वापर नको!सध्या भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांनी चिनी वस्तूंचा वापर पूर्ण टाळावा, असे आवाहन ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व मंडळांना केले आहे. सजावटीसाठी लायटिंग, तोरण, रंग अशा अनेक वस्तू चिनी असतात. त्यामुळे यंदाच्या उत्सवात या वस्तू वापरू नयेत आणि स्वदेशी वस्तूंवर भर द्यावा, असेही या आवाहनात म्हटले आहे. सध्या समितीशी २५० गणेशोत्सव मंडळ जोडले आहेत. त्यांना सोशल मीडियाद्वारे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसादही मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितले.