शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

By अजित मांडके | Updated: September 30, 2022 16:55 IST

आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा नवरात्रोत्सव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बाळासाहेबांची भुमिका, त्यांचे विचार कोणी खंडीत केले, त्यांच्या विचारांबरोबर प्रतारणा कोणी केली, सत्तेसाठी तडजोड कोणी केली हे मला सांगण्याची आवश्यकता आहे का?, बाळासाहेबांच्या विचाराची भुमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत, आणि म्हणूनच राज्यातील प्रत्येक घटक हा आमच्या भुमिकेला समर्थन देत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मात्र योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील त्यांनी उध्दव ठाकरे यांना दिला.

ठाण्यात गुरुवारी उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने टेंभी नाका देवीची महाआरती करुन एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले असतांनाच शुक्रवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह देवीची विधिवत पुजा केली. तसेच महाआरती देखील केली. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेवे त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. ठाण्यात गुरुवारी उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने टेंभी नाका देवीची महाआरती करुन एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले असतांनाच शुक्रवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह देवीची विधिवत पुजा केली. तसेच महाआरती देखील केली. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेवे त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. 

आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा नवरात्रोत्सव आहे. या उत्सवाला वेगळी ओळख आहे, यथोचित पुजन व आरती दरवर्षी करीत असतो, यात सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते नागरीकांसोबत आरती केली असल्याचे त्यांनी सांगितले. देवीची सेवा करीत करीत मी य पदार्पयत पोहचलो आहे. देवीचा आर्शिवाद सर्वावर आहे, तो राज्यातील जनतेवरही राहावा. राज्यातील संकट, अरीष्ट, रोगराई, दुख सर्व दुर व्हावे, लोकांचे जीवन बदलू दे, त्यांच्या जीवनात अमुर्लाग बदल होऊ दे, त्यांच्या जीवनात सुख, समृध्दी, समाधान आरोग्य चांगले लाभू दे आणि या राज्याला  सुजलाम सुफलाम होऊ दे अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना केली असल्याचेही त्यांनी सांगितले. रश्मी ठाकरे यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावर त्यांना विचारले असता, ही  शक्तीप्रदर्शनाची जागा नाही, ही मनोभावे पुजा करण्याची जागा असल्याचे त्यांनी सांगितले. टेंभीनाक्याचा हा उत्सव आहे, तो अखंडीतपणो पुढे नेण्याचे काम मी शिवसैनिक म्हणून करीत आहे. संजय राठोड यांच्या बाबत प्रश्न विचारला असता ११ महंत त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी त्यांच्या समवेत वडील संभाजी, पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातू आदींसह कुटुंबातील इतर सदस्य या पुजेत सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास ही पुजा सुरु झाली. तर साडेतीन वाजता महाआरती घेण्यात आली. यावेळी शिंदे गटातील महत्वाचे पदाधिकारी व इतर कार्यकत्र्यानी टेंभीनाक्यावर गर्दी केली होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे