शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टर पुनर्विकास म्हणजे जमीनबळकाव मोहीम; मतदाता जागरण अभियानचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:15 IST

प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी

ठाणे : महापालिकेने नव्याने क्लस्टर योजनेच्या अमंलबजावणीसाठी क्लस्टर इम्प्लिमेंटेशन युनिट स्थापन करून त्याअंतर्गत ४ गट स्थापन (लाभार्थी ठरविणे, एफएसआयची मोजणी करणे, सोयीसुविधा सर्वेक्षण, कायदेशीर बाबींची तपासणी) केले आहेत. यासाठीचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावरठेवला आहे. यावर ६.५ कोटींचा खर्च केला जाणार असल्याने या प्रस्तावास मंजुरी देऊ नये, अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने लोकप्रतिनिधींकडे केली आहे. मुळात क्लस्टर पुनर्विकास म्हणजे जमीन बळकावण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.महापालिकेने मोठा गाजावाजा करून क्लस्टर (समूह विकास योजना) योजना जाहीर झाली. परंतु, जनतेला विश्वासात न घेता व जबरदस्तीने ही योजना सोसायट्यांना स्वीकारण्यास भाग पाडण्याची स्थिती निर्माण करणे यात कोणाचा स्वार्थ आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. या योजनेस रेरा कायदा लागू नाही, त्यामुळे फसवणूक झाल्यास कोठे दाद मागणार?, ज्या सहकारी सोसायट्या मान्यता देतील, त्यांच्या मालकीची जमीन जाऊन त्याचा विकास लीज होल्ड जमिनीवर केला जाणार, अनेक सोसायटीचे कन्व्हेन्स झालेले नाही. त्यांनी डीम कन्व्हेन्स करून घेणे आवश्यक आहे.सोसायटी कमिटीने याबाबत ठराव करून कार्यवाही सुरू करावी, पुनर्विकास करताना मूळ जागा मालकांना पर्यायी जागा देणे बंधनकारक करणे, जे रेरा कायद्याअंतर्गत आहे ते सक्तीचे करावे. तसेच जागा दिली नाही तर पर्यायी जागेचे भाडे व डिपॉझीट देणे विकासकावर बंधनकारक करावे, डेव्हलपमेंट करारात पेनेल्टी क्लॉज असला पाहिजे म्हणजे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पेनेल्टी म्हणून दर महिन्याच्या भाड्याइतकी रक्कम गाळेधारकला देण्याची तरतूद हवी, तसेच स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाळी, लोकवस्त्या आणि अधिकृत तसेच अनाधिकृत इमारती पाडून क्लस्टर योजनेच्या नावाने त्या पुन्हा बांधायच्या मोठ्या जनसंख्येला लीजवरम्हणजे भाड्याच्या घरात राहाण्यास भाग पडायचे या बदल्यात विकासकांनी प्रचंड नफा कमवायचा असाच काहीसा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.अ‍ॅग्रीमेंट तपासून बघण्याचे आवाहनक्लस्टर करिता केली जाणारी अ‍ॅग्रीमेंट तपासून बघा, समजले नाही तर समजून घ्या. प्रश्न घराचा आहे. चूक केलीत तर आयुष्यभर भोगावी लागेल. काळजी घ्या. मदत हवी असेल तर हाक मारा, असे आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियानाचे वतीने करण्यात आले आहे.