शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

क्लस्टरच्या सुनावणीत गावठाण, कोळीवाडेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:58 IST

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला हरताळ; महापौरांकडे तक्रार

ठाणे : गावठाण आणि कोळीवाडे क्लस्टरमधून वगळण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असतानासुद्धा ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून गावठाण आणि कोळीवाड्यामधील नागरिकांना जनसुनावणीसाठी बोलवण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यासंदर्भात चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने महापौर मीनाक्षी शिंदे यांना एक पत्र देऊन या जनसुनावण्या रद्द करण्याची मागणी केली आहे.महापालिकेने शहरातील ४४ भागांसाठीच्या विकास आराखड्यासंदर्भात योजना जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील गावठाण आणि कोळीवाड्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी महापालिकेच्या या कृतीविरोधात आंदोलने उभी केली होती. तसेच या योजनेचा अभ्यास करून त्याला गावठाणासोबत जोडून पाहिल्यावर अनेक धोके समोर आले. अनेक हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. एकूणच ही योजना भूमिपुत्रांच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि अस्तित्वाचा आणि त्यांच्या हिताचा विचार करण्यात फोल ठरल्याची भावना निर्माण झाली होती. परिणामी, शहरातील गावठाणे, कोळीवाडे आणि पाड्यांमध्ये राहणाऱ्या भूमिपुत्रांनी क्लस्टर योजनेमधून गावठाण, कोळीवाडे आणि पाडे वगळण्याची मागणी केली होती. यातूनच ठाणे शहरातील भूमिपुत्रांसोबत ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई, मुंबई आणि रायगड भागातील भूमिपुत्र संस्थांनी एकत्रित येऊन आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाची स्थापना केली आहे. या महासंघामध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश आहे.भूमिपुत्रांच्या या लढ्याला मतदार जागरण अभियान, स्वराज्य इंडिया, स्वराज अभियान या सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिल्याने यातून एक मोठी जनचळवळ उभी राहिली. यामध्ये ठाण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी गावठाण, कोळीवाडे येथे राहणाºया नागरिकांची बाजू हिरिरीने अधिवेशनात मांडली.जनतेच्या आक्रमकतेपुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. शेवटी, क्लस्टर योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. परंतु, असे असतानाही अद्याप ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून गावठाण, कोळीवाड्यांमध्ये राहणाºया नागरिकांना जनसुनावणीसाठी बोलवण्यात येत असल्याचा आरोप चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने केला आहे.महापौर मीनाक्षी शिंदे यांना यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून, ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर गावठाण, कोळीवाडे क्लस्टरमधून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर मग आता ही जनसुनावणी का घेण्यात येत आहे, असा सवाल करून संवर्धन समितीच्या उपस्थितीत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी समितीने महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.महापालिकेत तक्रारदारांचा गोंधळठाणे शहरात राबविण्यात क्लस्टर योजनेविरोधात असलेल्या नागरिकांच्या तक्र ारी निकाली काढण्यासाठी सोमवारी महापालिकेत सुनावणी आयोजिली होती. मात्र, मुख्यालयात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे काही तक्रारदारांनी गोंधळ घालून ती रद्द करण्याची मागणी केली.जनसुनावणी मोठ्या सभागृहात आणि सक्षम अधिकाºयांच्या उपस्थितीत घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकारामुळे मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. सुनावणीसाठी ५० जणांना बोलविण्यात आले होते आणि बसण्यासाठी केवळ १४ जागा होत्या.वेळेवर सुनावणी सुरू झाली नाही. योजनेबाबत प्रशासनाकडून उत्तरे दिली जात नाही, अशा स्वरु पाचे हे आक्षेप होते. तसेच सुनावणी जबरदस्तीने घेतल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे