शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरची परीक्षा सुरु, हरकती, सूचनांसाठी ३० दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:45 IST

ठाण्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डरांना विशेष रस असलेल्या बहुचर्चित क्लस्टर डेव्हल्पमेंट अर्थात समूहविकास योजनेचा नारळ दिवाळीत फोडण्याचा चंग बांधून तशा हालचाली सुरू आहेत.

- नारायण जाधवठाणे : ठाण्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डरांना विशेष रस असलेल्या बहुचर्चित क्लस्टर डेव्हल्पमेंट अर्थात समूहविकास योजनेचा नारळ दिवाळीत फोडण्याचा चंग बांधून तशा हालचाली सुरू आहेत. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून नानाविध संकल्पनांचे मनोरे उभारून ठाणेकरांना स्वप्ने दाखवण्याचे काम सुरू आहे. जणू क्लस्टर दारी आले, असा आविर्भाव या मंडळींचा असला, तरी क्लस्टरची खरी परीक्षा आता कुठे सुरू झाली आहे.महाराष्ट्र नगररचना कायदा १९६६ च्या कलम ३७ क आणि ग नुसार क्लस्टरच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सर्वसामान्यांच्या हरकती आणि सूचना आता मागविण्यात आल्या आहेत. सोमवारपासून येत्या ३० दिवसांत त्या द्यावयाच्या असून त्यानंतर त्यावर सुनावणी होऊन ही अडथळ्यांची शर्यत पूर्ण होऊन क्लस्टरचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, सुनावणी समानधानकारक झाली नाही आणि त्यावर कोर्टकचऱ्या सुरू झाल्या, तर क्लस्टर अनिश्चित काळापर्यंत लांबणीवर पडण्याची भीती आहे.एकंदरीत ठाण्यातील राजकारण, शहराची रचना, मतदाता जागरण अभियानासारख्या शहराच्या ज्वलंत प्रश्नावर जागरुक असलेल्यासंस्था आणि क्लस्टरसाठी अत्यावश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे वाटते तेवढे सोपे नसल्याने दिवाळीत क्लस्टरचा नारळ फोडण्याचे राज्यकर्ते आणि आयुक्तांचे स्वप्न लांबणीवर पडण्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहेत.महापालिकेने दाखविलेली स्वप्नेठाणे शहरात क्लस्टर योजना ४३ सेक्टरमध्ये राबविली जाणार आहे. पहिल्या टप्यात ती पाच सेक्टरमध्ये राबविली जाईल. त्या अंतर्गत तब्बल २३ टक्के जागा विकसित केली जाईल. ठाणे शहरात सध्या पाच हजार ९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध आहे. नागरी पुनरूत्थान योजनेतंर्गत त्यातील एक हजार २९१ हेक्टर जमिनीवर क्लस्टर प्रस्तावित आहे.शहरातील २३ टक्के जागा विकसित झाल्यास ठाण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा उपलब्ध होतील. यात क्रीडा, सांस्कृतिक, सुरक्षा, दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचत गटांसाटी स्वतंत्र जागा, समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरविणारे कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटरची सुविधा यांचा समावेश आहे.या योजनेत ३०० चौरस फुटापर्यंत मोफत घर मिळेल. त्यानंतरची जागा बाजार भावानुसार विकत घ्यावी लागेल.या आहेत अर्टी व शर्तीच्कमीत कमी १० हजार चौरस मीटरचा भूखंड हवा.च्३० वर्षे जुन्या अनधिकृत इमारती तसेच धोकादायक इमारतींचा करता येणार समावेश.च्सरकारी इमारतींचा समावेश करायचा झाल्यास परवानगी आवश्यक.च्एसआरएने स्लम म्हणून जाहीर केलेल्या झोपड्यांचाच करता येणार विकास.च्अधिकृत इमारतींतील रहिवाशांपैकी ७० टक्के रहिवाशांची संमती आवश्यक.च्एमएमआरडीए विभागात सरकारी योजनेतील घर मिळवलेल्यांना क्लस्टरचा लाभ नाही.च्एमआयडीसीच्या जागेसाठी त्यांची संमती सक्तीची.च्वन आणि सीआरझेडक्षेत्रात विकास करता येणार नाही.च्रस्त्यांचे बंधन पाळणे गरजेचे.संक्रमण शिबिरे आहेत कुठे?ठाण्यात सध्या रस्ता रुंदीकरणातील बाधितांना पुरेशा प्रमाणात पुनर्वसनासाठी घरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे समूह विकासात एवढ्या मोठ्या प्रमाणात घर सोडावी लागणाºया ठाणेकरांना कोणत्या संक्रमण शिबिरात ठेवणार? तेथे पुरेशा सुविधा आहेत का? तेथे जायला ते तयार आहेत, की नाही? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. हे कळीच मुद्देच क्लस्टरच्या विकासात अडथळे ठरण्याची भीती आहे.राजधानी मुंबईतील पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अद्याप अनेक कारणांमुळे पूर्ण झालेले नाहीत. मोठे घर मिळेल, या आशेने इमारत किंवा मूळचे घर रिकामे करणारे रहिवासी मात्र आजही गलिच्छ आाणि सोयीसुविधा नसलेल्या संक्रमण शिबिरात जीव मुठीत धरून जगत आहेत. ते पाहता पुनर्वसनाची सोय हाही मुख्य मुद्दा ठरेल.सलग भूखंडाचीमुख्य अडचणयात क्लस्टरसाठी सलग १० हजार चौरस मीटर अर्थात अडीच एकरांचा सलग भूखंड असणे आवश्यक आहे. त्याला चार चटईक्षेत्र हवे असल्यास त्यातील अटींनुसार १८ मीटरचा रस्ता आवश्यक आहे. ही अटच क्लस्टरमधील सर्वात मोठी अडचण आहे. याशिवाय सीआरझेड, वन विभागाच्या जागेवर विकास करतांना केंद्राची परवानगी लागणार आहे. त्यात चुकीची पावले उचलल्यास पर्यावरणवाद्यांकडून हे प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादापुढे जाऊ शकते.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या