शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद

By admin | Updated: August 24, 2015 02:30 IST

शहरात मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फलू आदींच्या रुग्णांत वाढ झाली असताना आरोग्य विभागातील २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद आहेत. जंतुनाशके

उल्हासनगर : शहरात मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फलू आदींच्या रुग्णांत वाढ झाली असताना आरोग्य विभागातील २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद आहेत. जंतुनाशके, मलेरिया आॅइल, ब्लिचिंग पावडर आदी साहित्याचा साठा उपलब्ध नसल्याने विभागाचा सावळागोंधळ उघड झाला आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी लोकमतच्या बातमीची दखल घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची पाहणी केली. महापालिका हद्दीत स्वाइन फलूच्या ८ पॉझिटिव्ह रुग्णांसह २५ डेंग्यू, ५२ मलेरिया व व्हायरल तापाच्या १५०० रुग्णांची नोंद झाल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पालिका आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. जंतुनाशके, मलेरिया आॅइल, ब्लिचिंग पावडर, धूरफवारणीची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. धक्कादायक माहिती म्हणजे आरोग्य विभागाच्या २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे कित्येक महिन्यांपासून बंद असून इतर यंत्रे नावालाच सुरू असल्याचे उघड झाले आहे. जंतुनाशकांसह इतर साहित्य खरेदीवर पालिकेने लाखो-कोट्यवधींचा खर्च करूनही मलेरिया आॅइल, जंतुनाशके कोणत्या प्रभागात व परिसरात टाकली, याची नोंद नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. लाखो नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्यासह वरिष्ठावर कारवाई करण्याची मागणी आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे. पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी शासकीय तसेच खाजगी दवाखान्यातील रुग्णांची नोंद ठेवली असून पालिका आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. पालिकेचे स्वत:चे रुग्णालय नसल्याने शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. गरज पडल्यास विशेष कक्ष उघडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.