शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमधील १० जीन्स कारखाने बंद

By admin | Updated: July 4, 2017 06:56 IST

वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच कारखानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेतली. वालधुनी नदी ही सगळ््यात जास्त प्रदूषित नदी असून तिचा नाला झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथ व उल्हासनगरातील जागरूक नागरिकांनी एकत्रित येऊन ‘वालधुनी बचाव’ मोहीम आखली आहे. तिचाच भाग म्हणून जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासोबत ‘वालधुनी बचाव’ मोर्चा काढण्यात आला. प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. त्यासाठी ‘सेपरेट सिव्हर’ हे घोषवाक्य घेत स्वाक्षरी मोहीम झाली. त्यात पाच हजार जण सहभागी झाले. त्याचे निवेदन सरकारी यंत्रणांना दिले. प्रक्रिया करुन स्वतंत्र वाहिन्यांद्वारे सांडपाणी खाडीत दूरवर सोडावे, अशी मागणी करण्यात आल्याचे वालधुनी जलबिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी सांगितले. जल बिरादरीचे आठ कार्यकर्ते त्यासाठी काम करीत आहेत. ८ आॅगस्ट हा उल्हासनगरचा स्थापना दिवस आहे. या दिवशी पुन्हा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उल्हासनगरात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी रिव्हर मार्च काढला जाईल. वालधुनी नदीत केवळ सांडपाणीच नव्हे, तर जीन्स कापड उद्योगातील रासायनिक सांडपाणी, उद्योगातून तयार होणारे रसायनमिश्रित पाणी, रासायनिक घनकचरा टाकला जातो. त्यावर ठोस कारवाईची मागणी जलबिरादरीने केली आहे.