शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

"कर्जत-कसारा मार्गावरील स्थानके बंदिस्त करा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:48 IST

रेल्वे प्रवासी महासंघाने केली मागणी; सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न

बदलापूर : रेल्वे प्रवाशांच्या व रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा तसेच रेल्वेच्या महसूल नुकसानीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत व कसारा मार्गावरील सर्व उपनगरी रेल्वे स्थानके बंदिस्त करावीत, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व रेल्वेच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी केली आहे.कल्याणपुढे शहाड ते कसारा अशी ११ स्थानके आहेत. तसेच विठ्ठलवाडी ते खोपोली अशी तब्बल १४ स्थानके आहेत. यापैकी बहुतेक स्थानके सर्वच बाजूंनी खुली व अनेक चोरवाटा असणारी आहेत. या दोन्ही मार्गांवरील अनेक स्थानकांतून आजवर रेल्वेच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे. विनातिकीट प्रवास करून चोरवाटेने शेकडो प्रवासी पसार होण्याचे प्रमाण कर्जत व कसारा मार्गावर खूप मोठे आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रचंड महसुली नुकसान वर्षानुवर्षे होत असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे.ग्रामीण भागातील उपनगरी रेल्वे स्थानकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानकांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी आपली मागणी असून यासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्थानके खुली असल्यामुळेच या दोन्ही मार्गांवरील तब्बल १२ स्थानकांवर प्रारंभीचे दोन महिने अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांच्याकरिता लोकलही थांबविल्या जात नव्हत्या. त्यामुळे हजारो सरकारी नोकरदारांना प्रचंड त्रास भोगावा लागला होता, याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले आहे.