शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ची केडीएमसीकडून खिल्ली

By admin | Updated: December 22, 2016 05:41 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली

कल्याण : केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली उडवल्याचे मंगळवारच्या महासभेत उघड झाले. हगणदारीमुक्त प्रभागांची सादर केलेली यादी बोगस आहे, असा आरोप सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी केला. यावर प्रशासनाने सादर केलेला घोषणेचा प्रस्ताव फेटाळून लावत चौकशीचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसी हद्दीतही हगणदारीमुक्त प्रभागाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअंतर्गत राबवलेल्या अभियानात महापालिकेच्या १२२ प्रभागांपैकी ८६ प्रभाग हे हागणदारीमुक्त प्रभाग झाल्याची घोषणा करणारा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मान्यतेसाठी दाखल केला होता. तो चर्चेला येताच रोहिदास वाडा प्रभागाच्या नगरसेविका शकीला खान यांनी यादीतील त्यांच्या नावाला हरकत घेतली. आजही माझा प्रभाग हागणदारीमुक्त न झाल्याची माहिती सभागृहात दिली. प्रशासनाने खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनीही यादी बोगस असल्याची टीका केली. प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचे पत्र नगरसेवकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहे, असा गंभीर आरोप नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या ‘स्वच्छ भारत’ची प्रशासनाने चेष्टा केली आहे. याप्रकरणी मनसेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार आहे, असे नगरसेवक पवन भोसले यांनी स्पष्ट केले. महापौरांनीही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भोसले यांनी केली. नगरसेवक राहुल दामले यांनी तर मी पत्रावर सही दिली असताना प्रशासनाने सादर केलेल्या हगणदारीमुक्त यादीत माझ्या प्रभागाचे नाव नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले असता सभागृहात एकच हंशा पिकला. दरम्यान, महापौर देवळेकर यांनीही यावेळी प्रशासनाच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यांना कोणतेही गांभिर्य गांभीर्य नाही. केवळ कागदोपत्री कामे दाखविली जात आहेत. अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. अनेक ठिकाणी शौचालये दुरुस्त देखील झालेली नाहीत. नगरसेवकांच्या भावना तीव्र असून, यात जातीने लक्ष घालावे, अशा शब्दांत महापौरांनी आयुक्त रवींद्रन यांना सुनावले. (प्रतिनिधी)